Type Here to Get Search Results !

पुणे येथील धिंड प्रकरणी पोलिसांवर दाखल केलेले पाठीमागे घेणे बाबत पोलीस मित्र सोशल चे रविवारी आंदोलन

 



सोलापूर (प्रतिनिधी ) पुणे येथील खुनाच्या गुन्ह्यांतील आरोपींची धिंड काढून त्यांना मारहाण करणे आणि खुनाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांना पोलिस व्हॅनच्या बोनेटवर बसवून फिरवल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १३ पोलिसांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने 'सीआयडी'ने कारवाई केली असून, यात अॅट्रॉसिटी कायद्याचाही समावेश आहे.


तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक आण्णा मधुकर दराडे, नीलेश राजेंद्र मोकाशी, फकीर, हवालदार सुनील हनवते, अंमलदार सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक ओंधकर मितेश दत्तात्रेय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, अंमलदार सुतार व पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एसआरए कॉलनी परिसरात पाच ते नऊ जुलै दरम्यान घडली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पोलिस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांनी याबाबत फिर्याद दिली. रहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी पाच जुलैला दुपारी शरण आले होते. यातील आरोपीचा आयोगाने नोंदविलेल्या जबाबाप्रमाणे मानसिंग पाटील व इतर पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी पट्टाने हाता-पायावर मारहाण केली. त्यांना एसआरए कॉलनीत नेत चित्रीकरण केले होते. या घटनेमुळे पोलीस दलात मोठया प्रमाणात खळबळ उडाली असून गंभीर गुन्हे दाखल झाल्याने महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच बरोबर असुरक्षिततेची भावना देखील वाढू लागली आहे 

आरोपीची धिंड काढल्या प्रकरणी थेट पोलीस अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाल्याने थेट तपास यंत्रणावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसत आहे. याबाबत पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने पोलीस अधिकारी /कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे पाठीमागे घेणे बाबत सोलापूर चे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केले होते 

या बाबत राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने रविवार दिनांक 18/10/2026 रोजी पूनम गेट येथे 

 फलक लावून सकाळी 10 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणारअसल्याची माहिती पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे संस्थापक 

यशवंत पवार यांनी दिली असून या आंदोलनात पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार असल्याची कळवले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.