Type Here to Get Search Results !

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी करणाऱ्या चोराला अटक

 



बार्शी (प्रतिनिधी ) दिनांक 17 10 2026 रोजी रात्री 9 : 30 मिनिटांनी कासारवाडी रोड येथून विकास लक्ष्मण हिंगमिरे त्यांचा पत्नीसह चालत जात असताना मोटरसायकलवर आलेल्या आरोपी महादेव शंकर पवार व विनोद गोविंद पिंगळे यांनी विकास लक्ष्मण हिंगमिरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन पसार झाले होते त्या आरोपीचा शोध बार्शी शहर पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने या चोरीचा छडा लावला आहे तसेच आरोपीकडे 3400 ग्रॅम वजनाचे दागिने किंमत २ लाख १0 हजार 399 व पल्सर गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून आरोपी क्र १ महादेव शंकर पवार यास शिताफीने अटक केली असून तो राहणारा महाळुंग तालुका माळशिरस येथील आहे दुसरा आरोपी विनोद गोंविंद पिंगळे याचा शोध सुरू आहे सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अभयकुमार माकणे, प्रवीण साठे,शबाना कोतवाल,धनराज फतेपुरे, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव,एजाज शेख,राहुल उदार, सचिन नितनाथ,अविनाश पवार, सतीश उघडे,दत्ता सोमवार, सचिन राऊत, संतोष जाधवर, लक्ष्मण शेळके व सायबर विभागाचे राहुल सोनकर यांनी ही कामगिरी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.