Type Here to Get Search Results !

सीसीटीव्हीद्वारे 'एचएसआरपी' नसलेल्या वाहनांना दंड पहिल्यांदा ५००, दुसऱ्यांदा १५०० दंड; शहर वाहतूक पोलिसांची माहिती




सोलापूर (सोलापूर ) 'एचएसआरपी' (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नसल्याने वाहनांवर सध्या दंडात्मक कारवाई केली जात आहे. पहिल्यांदा ५०० रुपये आणि दुसऱ्यावेळी दीड हजार रुपयांचा दंड होतो. पण, 'एचएसआरपी' नसलेले वाहन समोर असेल तरच की सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पण कारवाई होते, याचे उत्तर आता मिळाले आहे. पोलिसांच्या नियंत्रणातील शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखील दंडात्मक कारवाई होते, असे सोलापूर शहर वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.


सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने शहरात ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.


महापालिकेतील नियंत्रण कक्षात दररोज दोन वाहतूक पोलिसांना ड्यूटी दिली जाते. वाहतूक नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांना शोधून त्यांना ऑनलाइन दंड पाठवला जातो. यात 'एचएसआरपी' नसलेली वाहने, विनाहेल्मेटचे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ये-जा करणारे, मोबाईल टॉकिंग करणारे


आणि चालकाशेजारी सीटवर प्रवासी बसविणाऱ्या रिक्षांचा समावेश आहे. ज्या वाहनाला 'एचएसआरपी' बसवलेली नाही, त्यांना सुरुवातीला ५०० रुपयांचा दंड ऑनलाइनच पाठविला जातो. त्यासोबत नंबरप्लेट जुनी असल्याचा फोटो देखील पाठविलेला असतो. पहिला दंड प्रलंबित असल्यास पुढच्यावेळी त्या वाहनाला आपोआप 1500 रुपयांचा 


दंड पडतो, असेही वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत त्याचे नियंत्रण कक्ष महापालिकेत आहे त्या ठिकाणाहून शहरातील रस्त्यावरून ये -जा करताना जे वाहन चालक नियम मोडतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते यात हेल्मेट नसणे, एचएसआरपी नसलेली वाहने ट्रिपल सीट व रिक्षात समोरील सीटवर प्रवासी अश्यांचा समावेश आहे 

मनोजकुमार यादव 

सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.