Type Here to Get Search Results !

विनापरवाना बॅनर व डिजिटल वर पोलीस आयुक्तांची असणार करडी नजर विनापरवाना बॅनर व डिजिटल लावणाऱ्यावर थेट चॅप्टर केस -पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा आदेश




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात कोठेही विनापरवाना तथा अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग लावणाऱ्यांवर आता महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार आहे. संबंधित व्यक्तीला बोलावून पोलिस उपायुक्त यांच्या समोर त्यांची सुनावणी होईल त्यावेळी त्याच्याकडून चांगल्या वर्तनाचा किमान ५० हजार रुपयांचा बाँड घेणार अशा पद्धतीने चॅप्टर कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

विनापरवाना डिजिटल बॅनर लावल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई समोरील व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीनुसार किमान ५० हजार रुपयांचा बाँड घेतला जाणार आहे. एखाद्याची आर्थिक स्थिती चांगली असल्यास त्याच्याकडून एक लाखांहून अधिक रकमेचा बाँड घेतला जाईल, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही कायद्याचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीला बाँडवरील


रक्कम जमा करावी लागते. पैसे न भरल्यास त्याची रवानगी थेट तुरूंगात होईल, असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी दिला. वारंवार सूचना करूनही महापालिकेच्या परवानगीशिवाय आणि बॅनरवरील मजकूर पोलिसांकडून खात्री करून न घेता अनेकजण रस्त्यांलगत, चौकाचौकात डिजिटल फलक लावत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी आता संबंधितांवर चॅप्टर केस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.एकंदरीत यहाँ हें हम हें राजकुमार या लोकप्रिय डॉयलॉग चा पुन्हा एकदा सोलापूरकरांना प्रत्यय आला असून शहरातील विनापरवाना बॅनर वर आता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची करडी नजर असणार असून थेट चॅप्टर केस दाखल होत असल्याने बॅनरबाजी करणाऱ्या लोकांची पाचावर धारण बसली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.