सोलापूर(प्रतिनिधी ) नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि रात्रकालीन गस्त सुरू असतानाच, बुधवारी पहाटे पुणे रस्त्यावर दारूच्या नशेत एका लक्झरी बसला अडवून चालकाशी वाद घालणाऱ्या टवाळखोर तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि बीट मार्शलच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला असून, घाबरलेल्या परराज्यातील प्रवाशांना आणि चालकाला मोठा दिलासा मिळाला आहे.
नेमकी काय घडली घटना?
बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पुणे महामार्गावरून एक परराज्यातील लक्झरी बस प्रवाशांना घेऊन जात होती. त्याच वेळी रात्री उशिरापर्यंत पार्टी करून मद्यप्राशन केलेले सोलापुरातील काही टवाळखोर तरुण कारमधून परतत होते. हे तरुण जुनी वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. काही कारणावरून या तरुणांची लक्झरी बसचालकासोबत वादावादी झाली.
नशेत असलेल्या या तरुणांनी थेट रस्त्यात लक्झरी बस अडवून चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पहाटेच्या अंधारात अचानक बस अडवल्यामुळे आत बसलेले प्रवासी आणि चालक प्रचंड घाबरून गेले. बसवर दरोडा किंवा लुटालूट होण्याची भीती निर्माण झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून सोलापूर शहर पोलिसांकडे मदत मागितली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घेतली घटनास्थळी धाव
घटनेचा कॉल मिळताच परिसरातील बीट मार्शलचे पोलीस कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी शहरात रात्रकालीन गस्तीवर असलेले सोलापूर शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कोणताही वेळ न घालवता पहाटे ५ वाजता थेट घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाची पाहणी करून आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ शहर पोलीस दलाच्या अतिरिक्त टीमला पाचारण केले. बसमधील भयभीत झालेले महिला, लहान मुले व प्रवाशांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि सुरक्षेची खात्री दिली.
पोलिसी खाक्या दाखवताच उतरली नशा.
चालक आणि प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या त्या मद्यधुंद तरुणांची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. रस्त्यावर गैरवर्तन करून सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या टवाळखोरांना पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांची नशा क्षणात उतरली आणि त्यांनी आपली चूक कबूल केली.शहर गुन्हे शाखेचा पदभार घेतल्या पासून
सोलापूर शहरातील जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी सह अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा हातखंडा असून गुन्हेगार कितीही मोठा असला तरी अरविंद माने यांच्या नजरेतून सुटू शकत नाही तपास अधिकारी अरविंद माने म्हटलं की भल्या भल्या गुन्हेगारांची पाचावर धारण बसते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा नावाचा महिमा वेगळाचं असून भल्याभल्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणून त्यांना जेलमध्ये पाठवण्याची क्रिया फक्त अरविंद मानेच करू शकतात.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ तर सज्जनांचा सखा म्हणून ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांना सोलापूर शहरात म्हटलं जातंय
