Type Here to Get Search Results !

पत्रकारांच्या सुख दुःखात धावून जाणारा आमच्या साठी मित्र बंधू सखा अन सबकुछ -राजन्ना (वाढदिवस विशेष लेख )




युवा पत्रकार राजू वग्गू हे सोलापूर मधील सुनील नगर येथील रहिवाशी असून लहानपणापासून त्यांना समाजसेवा बरोबर पत्रकारितेची आवड होती   

पत्रकारिता एक ध्यास चळवळ व विचार समजून सोलापूर शहरातील वंचित पिढीत घटकांच्या विकासासाठी व न्याय हक्कासाठी युवा पत्रकार राजू वग्गू हे नेहमीच आपल्या साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्रामाध्यमातून प्रयत्न करत आहेत जिथं आहे अन्याय तिथं त्यांची लेखणी पेटून उठायची समाजातील गोरगरीब अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मदतीला राजू वग्गू 

नेहमीच धावून जातात त्यांना प्रेमाने सर्वजन राजन्ना म्हणतात वंचित पिढीत घटकाच्या प्रश्नावर राजू वग्गू तुटून पडतात सरकारी दरबारात वंचिताचे प्रश्न मांडताना दिसतात 


सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पत्रकार म्हणून राजू वग्गू यांची सोलापूर शहरात आगळी वेगळी अन खास ओळख आहे पान विक्री व्यवसाय बरोबर समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आजवर अनेक वेळा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून स्वखर्चाने ते मोटारसायकल वरून सोलापूर शहरात फिरतात व अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करतात 


पत्रकारांच्या प्रश्नाची जाण अन भान 

युवा पत्रकार राजू वग्गू हे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष म्हणून काम पहात असून सोलापूर शहरातील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांची त्यांनी मोठी चळवळ उभी केली त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाची माहिती व जाण असल्याने पत्रकारांसाठी पत्रकार सुरक्षा समिती करत असलेल्या आंदोलन उपोषण निवेदन सारख्या लढ्यात त्यांनी नेहमीच सहभाग नोंदवला आहे युवा पत्रकार राजू वग्गू यांनी साप्ताहिक कार्यसम्राट च्या माध्यमातून निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता केली असून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी आपली पत्रकारिता जपली आहे पत्रकारांच्या सुख दुःखात राजू वग्गू यांचा नेहमीच सहभाग असतो त्यांना प्रेमाने व आदराने सर्वजन राजन्ना म्हणून हाक मारतात 


राजन्ना म्हणजे आमच्यासाठी प्रिय मित्र बंधू अन सखा आहेत 

अश्या युवा शांत संयमी अन दिलखुलास अन दिलदार व्यक्तीमत्व असलेल्या युवा पत्रकार राजू वग्गू यांचा वाढदिवस असून त्यांना निकोप निरोगी व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 


शुभेच्छुक !!


       यशवंत पवार  

प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र 

संस्थापक -पोलीस मित्र सोशल फौंडेशन 

संपादक -सा कार्यसम्राट 

संपादक -कार्यसम्राट न्यूज सोलापूर 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.