Type Here to Get Search Results !

खमके पीआय बिराजदार अन रिअल सिंघम अल्फाज शेख यांची गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारी कारवाई, 08 मोटारसायकलसह 03 हजाराचा मुद्देमाल हस्तगत.




सोलापूर (प्रतिनिधी ) एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत कायदा मोडणारी व्यक्ती कितीही मोठी असली तर गय केली जाणार नाही असा दमदार इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षकभाऊराव बिराजदार यांनी गुन्हेगारांना दिला असून कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचा विढा उचलणाऱ्या रिअल सिंघम अल्फाज शेख यांच्या बेधडक कारवाई ने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत आमच्या हद्दीत नाटक चालणार नाही असा स्पष्ट इशारा या दमदार कारवाई ने गुन्हेगाराला दिला आहे 


हातात धारदार कोयते घेऊन दुचाकीवरून दहशत माजवणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सोलापूर शहरातील विविध भागांतून चोरलेल्या तब्बल 08 मोटारसायकलींचा छडा लावला असून, 

एमआयडीसी पोलिसांनी सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. ही दमदार कारवाई १ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात करण्यात आली.याची पार्श्वभूमी अशी की गांधीनगर भागात दोन इसम हातात कोयते घेऊन मोटारसायकलवरून आरडाओरड करत दहशत निर्माण करीत फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार यांना दिली पोलीस उपनिरीक्षक शेख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांचा शोध सुरू केला.


पोलिसांना MH-13-FF-7053 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोन इसम हातात धारदार कोयते घेऊन फिरताना आढळून आले. पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सैफन उर्फ सोहेल नुरोददीन बागवान (वय २७, रा. अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि मोहन नागनाथ साळुंके (वय ४३, रा. सोलापूर) अशी सांगितली.


ताब्यातील मोटारसायकलबाबत पोलिसांनी चौकशी केली असता, ती चोरीची असल्याचे समोर आले. तपासात सदर मोटारसायकल एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि. नं. ८६३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींविरुद्ध शस्त्र कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला.


चौकशीत आणखी सात मोटारसायकलींचा धक्कादायक खुलासा 


आरोपींना अटक करून पुढील तपास केला असता, आरोपी मोहन साळुंके याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्याने साथीदार सैफन उर्फ सोहेल बागवान याच्यासोबत मिळून मागील दोन महिन्यांत सोलापूर शहरातील विविध ठिकाणांहून आणखी ७ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.


चोरीच्या या मोटारसायकली अक्कलकोट रोडवरील राजीव नगर परिसरातील मैदानाजवळील पडीक इमारतीच्या परिसरातील झाडीझुडपात, नागरिकांच्या सहज नजरेस पडणार नाहीत अशा ठिकाणी लपवून ठेवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी आरोपींच्या माहितीवरून त्या सातही मोटारसायकली जप्त केल्या.


अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ८ मोटारसायकली हस्तगत करून ८ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत ३ लाख १५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


आठ चोरीच्या वाहनांचा कसून तपास 


एमआयडीसी पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांतील मोटारसायकलींचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये MH-13-FF-7053, MH-13-BC-5912, MH-13-AS-2688, एम-२६५०, MH-13-AD-6733, MH-13-BY-0835, MH-13-BL-5849 तसेच जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील MH-12-EN-2314 या मोटारसायकलींचा समावेश आहे.


पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी सैफन उर्फ सोहेल बागवान याच्यावर यापूर्वीचे गुन्हे असल्याचे नमूद करण्यात आले असून, मोहन नागनाथ साळुंके याच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये मोटारसायकल चोरी, शस्त्र कायदा तसेच महिला विषयक गुन्ह्यांचा समावेश आहे.


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, आमसिद्ध निंबाळ, नागेशसिंह चव्हाण, सचिनकुमार लवटे आणि सुहास अर्जुन यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

एकंदरीत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पदभार घेताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार यांची हद्दीतील गुन्हेगारांचे पायेमुळे समूळ नष्ट करण्यासाठी कडक पाऊले उचलली असून गुन्हेगार कितीही मोठा असला तर त्याला कायद्याचा बडगा दाखवला जाणार असल्याचा स्पष्ट इशारा अन संकेत या दमदार कारवाईतून पीआय बिराजदार यांनी दिला आहे 

सोलापूर शहर गुन्हे शाखेत कार्यरत असताना रिअल सिंघम अल्फाज शेख यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणून कानून के हात लंबे होते हें याची प्रचिती आणून दिली होती अल्फाज शेख सध्या एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत अनेक धडाकेबाज कारवाया केल्याने अल्फाज शेख यांची पोलीस दलात शिस्तप्रिय व कडक शिस्तीचे पोलीस अधिकारी म्हणून वेगळी ओळख आहे.

एकंदरीत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी उचललेल्या कडक पावलाचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.