सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर क्राइम पत्रकार संघाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवराष्ट्रचे पत्रकार विशाल भांगे यांची अध्यक्षपदी, तर खजिनदार म्हणून रवी मस्के आणि सचिव म्हणून परशुराम कोकणे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शासकीय विश्रामगृहामध्ये शुक्रवारी दुपारी पत्रकार विनायक होटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. प्रारंभी लोकमतचे आप्पासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पुण्यनगरीचे भरतकुमार मोरे, कटूसत्यचे पांडुरंग सुरवसे यांच्यासह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. क्राइम पत्रकारांच्या एकजुटीसाठी आणि विविध उपक्रमांचे आयोजन पुढील काळात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
*नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -*
*अध्यक्ष -* विशाल भांगे
*उपाध्यक्ष -* विजयकुमार बाबर, इरफान शेख, विश्वभूषण लिमये, योगेश तुरेराव
*कार्याध्यक्ष -* अश्विनी तडवळकर, आप्पासाहेब पाटील
*सचिव -* परशुराम कोकणे
*सहसचिव -* शहानवाज शेख, इब्राहीम मुजावर
*खजिनदार -* रविंद्र मस्के
*सहखजिनदार -* लक्ष्मीकांत शिंदे, दिनेश शिंदे
*प्रसिद्धीप्रमुख -* तौसिफ शेख, प्रमोद तुपसमुद्रे, यासिन शेख
*कार्यकारिणी सदस्य -* सूर्यकांत आसबे, शिवाजी सुरवसे, विनायक होटकर, उमाकांत चौडे, भरतकुमार मोरे, वैभव गंगणे, दिगंबर इप्पलपल्ली, इम्रान सगरी, विनोद कामतकर, रोहन नंदाणे
*सल्लागार -* अविनाश कुलकर्णी, राजकुमार नरूटे, भगवान परळीकर, संजय येऊलकर, पांडुरंग सुरवसे
*विधी सल्लागार -* अॅड. प्रदीपसिंह रजपूत, अॅड. संतोष न्हावकर
यानंतर सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला सागर सुरवसे, आफताब शेख, अभिषेक आदेप्पा, विक्रांत कालेकर, गौसपाक पटेल, अनिकेत गायकवाड, राहुल रणदिवे, संतोष कासे, रवि ढोबळे, राजकुमार पवार, चंदन बोल्लू, सौरभ वाघमारे, जागृत रणदिवे, अकबर बागवान, नागेश चिप्पा, फय्याज शेख यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
