Type Here to Get Search Results !

२०० किमीचा तपास, १६८ सीसीटीव्हींची पडताळणी, सोनसाखळी चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात: शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी.




सोलापूर (प्रतिनिधी)

जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी झालेल्या सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. घटनास्थळी थेट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तब्बल २०० किलोमीटरपर्यंतच्या मार्गावरील १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सलग आठ दिवस पडताळणी करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला


.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर यांच्या पथकातील इमरान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. त्यातून संशयित आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.त्यानंतर सपोनि शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली इमरान जमादार, उमेश पवार, विनोद रजपूत, रामा भिंगारे आणि सुरज पवार यांच्या पथकाने आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सुमारे २०० किलोमीटर अंतरातील १६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सलग आठ दिवस पडताळणी केली.


तांत्रिक विश्लेषणासोबतच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल, असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.