Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा प्रभारी कार्यकारी जिल्हा अध्यक्ष पदी बसवराज हमाले





सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी 


यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन 


यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताट मानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन पाच लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती  राज्य सरकारकडे आंदोलन उपोषण 


निवेदनच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे  पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे  पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर प्रभारी जिल्हा कार्यकारी जिल्हा अध्यक्ष पदी बसवराज हमाले यांची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार 


कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस संघटक मिरझागालिब मुजावर उपसंघटक शंकर माने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली असून सोलापूर जिल्हा प्रभारी कार्यकारी अध्यक्ष पदी बसवराज हमाले यांचे पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.