सोलापूर (प्रतिनिधी ) वळसंग पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष कायद्याच्या चौकटीत राहून सर्वसामान्य माणसाला योग्य ते मार्गदर्शन करत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारे हद्दीतील वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सर्वसामान्य नागरिकांचा हक्काचा आधार म्हणून आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांचा पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने वळसंग पोलीस ठाणे येथे शाल व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला
तसेच त्यांना निकोप निरोगी आयुष्याच्या उदंड शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पोलीस मित्र सोशल फौंडेशन चे संस्थापक यशवंत पवार सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर कार्यकारी अध्यक्ष बसवराज हमाले कार्याध्यक्ष रशीद शेख उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर अरुण सिडगिद्दी विष्णू सकट संदीप धोत्रे श्रीनिवास पेद्दी उपस्थित होते.
