सोलापूर (प्रतिनिधी ) गणेशोत्सवात डीजे डॉल्बी आणि मानवी डोळ्यांना घातक असणाऱ्या लेझर लाईट्सवर सोलापूर जिल्हा व पोलिस प्रशासनाने केलेल्या बंदीचे पोलीस मित्र सोशल फौंडेशन कौतुक व स्वागत करत असून हा नियम केवळ एका सणा पुरता मर्यादित न ठेवता वर्षभर कायमस्वरूपी लागू करावा या मागणी साठी पोलीस मित्र सोशल फौंडेशन सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहे
डीजेच्या कर्णकर्कश आवाजाच्या तालावर आजची तरुण मुले व्यसनाधीनतेच्या आहारी जात असून काही तरुण मुले डीजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत नाचताना दिसत आहेत डीजेच्या आवाजा मुळे काही लोकांना कायमचे बहिरेपण आलेले आहे
शाळा हॉस्पिटल कॉलेज तसेच हृदय रुग्ण लहान बाळ वृद्ध व आजारी लोकांना या डीजे व लेझर लाईट चा त्रास मोठया प्रमाणात सहन करावा लागत आहे लेझर लाईट्समुळे डोळ्यांचे पडदे जळणे आणि डीजे च्या कर्णकर्कश आवाजामुळे काही लोकांना कायमचे बहिरेपण तर काही लोकांना हृदयविकाराचा झटका यांसारखे गंभीर आरोग्य विषयी समस्या निर्माण होत आहेत.
हल्ली काही राजकीय व सामाजिक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त डीजे वाजवले जातात ही बाब अतिशय गंभीर असून अश्या आवाजाचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे
डीजे डॉल्बी च्या कायमस्वरूपी बंदीमुळे ढोल-ताशा, लेझीम आणि हलगीसारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्य संस्कृतीला ऊर्जितावस्था मिळून स्थानिक कलावंतांना हक्काचा रोजगार देखील मिळेल. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सोलापूर शहरातील मिरवणुकीत व इतर वेळी देखील डीजे लेझरलाईट सारखी घातक उपकरणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी मागणी पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती संस्थापक यशवंत पवार यांनी दिली आहे.
