Type Here to Get Search Results !

सामान्य माणसांचे प्रश्न सरकारी दरबारात तळमळीने मांडणारा पत्रकार अमर पवार. (वाढदिवस विशेष लेख )




युवा पत्रकार अमर पवार हे घोडेश्वर (ता मोहोळ)   येथील रहिवाशी असून लहानपणापासून त्यांना समाजसेवा बरोबर पत्रकारितेची आवड होती   

पत्रकारिता एक ध्यास चळवळ व विचार समजून मोहोळ तालुक्यातील वंचित पिढीत घटकांच्या विकासासाठी न्याय हक्कासाठी युवा पत्रकार अमर पवार हे नेहमीच आपल्या घोडेश्वर नगरी या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत जिथं आहे अन्याय तिथं त्यांची लेखणी पेटून उठायची समाजातील गोरगरीब अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या मदतीला अमर पवार नेहमीच धावून जातात सरकारी दरबारात नेहमीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा पत्रकार म्हणून अमर पवार यांची मोहोळ तालुक्यात आगळी वेगळी ओळख आहे शेती व्यवसाय बरोबर समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आजवर अनेक वेळा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या असून स्वखर्चाने ते मोटारसायकल वरून तालुक्यात फिरतात व अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करतात 

*पत्रकारांच्या प्रश्नाची जाण*

युवा पत्रकार अमर पवार हे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पहात असून मोहोळ तालुक्यातील पत्रकारांना एकत्र आणून पत्रकारांची त्यांनी चळवळ उभी केली त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाची माहिती व जाण असल्याने पत्रकारांसाठी पत्रकार सुरक्षा समिती करत असलेल्या आंदोलन उपोषण निवेदन सारख्या लढ्यात त्यांनी नेहमीच सहभाग नोंदवला आहे युवा पत्रकार अमर यांची निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड पत्रकारिता केली असून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्यांनी आपली पत्रकारिता जपली आहे 

अश्या युवा पत्रकार अमर पवार यांचा वाढदिवस असून त्यांना निकोप निरोगी व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 

          शुभेच्छुक 

       यशवंत पवार 

प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र 

संस्थापक -पोलीस मित्र सोशल फौंडेशन 

संपादक -सा कार्यसम्राट 

संपादक -कार्यसम्राट न्यूज सोलापूर 

💐💐💐🎉🎉🎉 💐💐💐💐🎉🎉🎉🎉

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.