सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीना त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी सन्मान चिन्ह सन्मान पत्र विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार केला जातोय पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार न्यूज सिक्सर चे पत्रकार आर डी जाधव यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे
*आर डी जाधव यांचा यांचा परिचय*
आर डी जाधव यांनी 2008 साली दैनिक स्वराज्य मधून पत्रकारिता ला सुरुवात केली असून लॉकडाऊन काळात साप्ताहिक वादग्रस्त मधून आपले कार्य जोमाने सुरु ठेवले त्या नंतर जनता राज्य न्यूज चॅनल व जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला सध्या ते न्यूज सिक्सर चे संपादक म्हणून कार्यरत असून त्यांनी क्राईम रिपोर्टर म्हणून युट्युब चॅनल काढले आहे त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून सर्वचस्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
