Type Here to Get Search Results !

तब्बल तीन वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा शहर गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली लावला छडा ; ११ लाख रुपयांचे दागिने हस्तगत.




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील मुमताज नगर परिसरात सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेली चोरी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका २६ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले तब्बल दहा लाख ९६ हजार रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत केले आहे. आरोपी शोयब रमजान शेख वय 26 राहणार मुमताज नगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे 






 फेब्रुवारी २०२४ मध्ये अज्ञात चोरट्याने सोलापूर येथील मुमताज नगर प्लॉट क्रमांक २ मधील एका बंद घरात प्रवेश केला होता चोरट्याने बेडरूम मधील कपाटाचे लॉकर तोडून आत ठेवलेले ९६ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता 


याकामी पोलीस उपयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि पोलीस सहाय्यक आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे,पोलीस अंमलदार बापू साठे,वसीम शेख,सुभाष मुंडे, सैफन सय्यद,युवराज गायकवाड,सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि सतीश काटे यांनी तपास केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.