Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती नूतन कार्यकारी जिल्हा अध्यक्ष बसवराज हमाले यांचा सत्कार

 



सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या नऊ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी 


राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण पत्रकारांना पत्रकारिता बरोबरच पूरक व्यवसाय करून समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे म्हणून राज्यातील पत्रकारांना विना अट व विना जामीन पाच लाख रुपये शासकीय बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे आंदोलन उपोषण निवेदनच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे.





पत्रकारांच्या बाबतीत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे 

पत्रकार सुरक्षा समिती च्या नूतन सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार बसवराज हमाले यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार व कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी जाहीर केली होती जेष्ठ पत्रकार बसवराज हमाले यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झालेने पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या 


यावेळी संस्थापक यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे 

सोलापूर शहर अध्यक्ष आंबादास गज्जम उपाध्यक्ष रमेश दग्गारी सचिव गणेश निंबाळकर जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.