Type Here to Get Search Results !

पत्रकार किशोर म्हमाने मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक, जिल्हाधिकारी यांची घेतली भेट : निवेदन केले सादर




सोलापूर (प्रतिनिधी ) सांगोला येथील 

संपादक किशोर म्हमाणे हे 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास दुचाकीवरून कढलास नाक्यावरून मिरज रोड ने जात असताना त्यांच्या पाठीमागुन काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या 


तीन इसमांनी म्हमाने यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर आणखी दहा ते पंधरा जणांनी लोखंडी रॉडने म्हमाने यांना डोक्यात व पाठीवर चैन ने मारहाण केली असून काही लोकांच्या हातात तलवार असल्याची माहिती मिळत असून इतर लोकांनी लाथा बुक्याने मारहाण केली आहे 


यात किशोर म्हमाने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला येथील मोहन हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत पत्रकार किशोर म्हमाने मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून सोलापूर चे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करत पत्रकार किशोर म्हमाने यांना मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे 


राज्यात वारंवार पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून बातमी लावण्यावरून मारहाण हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे पत्रकार किशोर म्हमाणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून संबंधित आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीने लावून धरली आहे 


पत्रकारांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत-

 प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार 

हल्ली राज्यात बातमी लावण्यावरून वाळू माफिया गुटखा माफिया सह अवैध व्यवसायिक बातमी लावण्यावरून पत्रकारांवर हल्ले मारहाण करत आहेत सदर ची बाब अतिशय गंभीर असून लोकशाहीला काळिमा फासणारी असून बातमी लावण्यावरून जर पत्रकारांवर कोणी हल्ले मारहाण करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला असून पत्रकार किशोर म्हमाने हल्ला प्रकरणी गुन्हेगारांना तात्काळ अटक न केल्यास पुढील आठवड्यापासून सोलापूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे 




या प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्व्यक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर रशीद शेख रमेश दग्गारी विष्णू सकट संदीप धोत्रे वैभव जाधव बसवराज हमाले इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.