सोलापूर (प्रतिनिधी )
आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी वळसंग गावासह पंच चक्रोशीतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते तसेच पोलिस पाटील यांची संयुक्त शांतता कमिटी ची बैठक वळसंग पोलिस ठाण्यात झाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे अक्कलकोट उपविभागीय
अधिकारी राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनखाली
झालेल्या बैठकीत गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था मिरवणुकीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि मंडळांनी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गणेशोत्सव हा भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे डीजे-डॉल्बीमुक्त मिरवणुका काढून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी केले.
यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरावा, यासाठी 'एक मंडळ-एक झाड, एक गणेशभक्त-एक झाड आणि प्रत्येक घर-एक झाड' ही संकल्पना राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
