Type Here to Get Search Results !

कर्तव्याच्या मनगटावर बांधला स्नेहाचा धागा: सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न




सोलापूर (प्रतिनिधी )

 समाजाच्या संरक्षणासाठी अहोरात्र खंबीरपणे उभे राहणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात आणि भावूक वातावरणात साजरा करण्यात आला. जय महाराष्ट्र शिवसेना पक्षाच्या पुढाकाराने आणि सौ. ज्योती अमोल भाले यांच्या नेतृत्वाखाली हा स्नेहबंधनाचा उपक्रम पार पडला. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तैनात राहून जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भगिनींच्या हस्ते राखी बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ओबीसी तालुका प्रमुख सौ. ज्योती अमोल भाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, "आज समाज अनेक संघर्षांतून जात असताना पोलीस बांधव सदैव आमच्या संरक्षणासाठी पाठीशी खंबीर उभे असतात. समाजातील प्रत्येक भगिनीच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या या खाकी वर्दीतील रक्षकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.


  या भावस्पर्शी कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे कुंदन गावडे महिला पोलीस डोंगरीतोट रामेश्वर कोडक, राशिद बाणेवाले, विवेक सांजेकर पोलीस हवालदार सत्यजित जगताप, बाळू चमके, अभिजीत साळुंखे, सागर शिंदे प्रकाश बनसोडे फिरोज बारजीगर रमेश शेख धनराज गायकवाड, सचिन चव्हाण यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनीही महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला.


या प्रसंगी सौ. पूजा ढगे, सौ. माधुरी माळी, कु. जान्हवी भाले, बबन मामा यांच्यासह अनेक माता-भगिनी उपस्थित होत्या. पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करून गेला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.