Type Here to Get Search Results !

फिटनेस प्रेमी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची पोलीस अधिकारी समवेत सायकल रॅली

 



सोलापूर (प्रतिनिधी ) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलेगा भारत, जितेगा भारत संकल्पनेतून सोलापूर पोलिस आयुक्त कार्यालय वतीने रविवारी संडेज ऑन सायकल रॅली पार पडली. यात सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांच्यासह अन्यअधिकारी सहभागी झाले होते. सुट्टीच्या दिवशीदेखील शरीरासाठी काही वेळ द्यावा, या हेतूने ही सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पोलिस

आयुक्त एम. राजकुमार यांचाही सहभाग होता. या प्रसंगी पोलिस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील वृष्टी जैन यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश चाटे आदी अधिकारी, अंमलदार सहभागी 

 झाले होते. रॅलीची सुरुवात पोलिस आयुक्तालयातून झाली. पुढे सात रस्ता, रंगभवन, पोलिस मुख्यालय, अशोक पोलिस चौकी, संत तुकाराम चौक, गुरुनानक चौकमार्गे पुन्हा पोलिस रॅली काढण्यात आली. आयुक्तालय या मार्गाने १० किलोमीटर रॅली काढण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.