Type Here to Get Search Results !

खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस, तीन आरोपी जेरबंद, एमआयडीसी डीबी पथकाची दमदार कामगिरी.




सोलापूर (प्रतिनिधी ) यातील फिर्यादी अबुजर मौलाली बिराजदार वय-२० वर्षे, व्यवसाय: इलेक्ट्रीशीयन, रा. प्लॉट नं.९२, कस्तुरबा नगर, नई जिंदगी बसवारुढ मठा जवळ, नई जिंदगी सोलापूर याचा भाऊ उमर मौलाली बिराजदार यास ०६/०८/२०२६ रोजी मध्यरात्री १२:१५ वा. ते सकाळी ०९:३० वा. चे दरम्यान नई जिंदगी पाण्याची टाकी, सोलापूर येथे कोणीतरी अज्ञात इसमाने धारधार हत्याराने डोक्यात, गालावर, हातावर वार करुन जिवे ठार मारले अश्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. ७३४/२०२६ भा.न्या.सं. २०२३ कलम १०३ (१) प्रमाणे दि. ०६/०८/२०२६ रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळी खुना सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याने पोलीस आयुक्त एम. राजकुमार अश्विनी पाटीलपोलीस उप आयुक्त गुन्हे प्रितम यावलकर पोलीस उप आयुक्त परिमंडळ दिलीप पवार, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे अरुण देवकर सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ यांनी पो. स्टे कडील अधिकारी व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन केले.

शहर गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांचेकडील तपास पथके वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे भाऊराव बिराजदार पो.नि गुन्हे श्रीमती संगीता पाटील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट देऊन सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली l दि.०६/०७/२०२६ रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, " नई जिंदगी पाण्याचे टाकी येथे मयत उमर बिराजदार यांचा खुन केलेले तीन इसम हे अक्कलकोट रोडवरील बी.एस.एन.एल टॉवर जवळील मोकळया मैदानात थांबलेले आहेत. " मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने बी.एस.एन.एल टॉवर जवळ, मल्लीकार्जुन नगर ब्रिजच्या बाजूस असलेल्या रोडवरील फुटपाथ जवळ थांबलेल्या तीन संशयीत (१) मन्सुरअली महंमद नदाफ वय २२ वर्षे, रा. घर नं.३७, सिध्देश्वर गांधी नगर भाग-५ नई जिंदगी सोलापूर २) आहद इकबाल सय्यद वय- २२ वर्षे, रा. प्लॉट नं. १०८, मजरेवाडी, सोलापूर. ३) अविनाश दशरथ चव्हाण वय २० वर्षे रा. घर नं. ०४, बापूजी नगर, मजरेवाडी, नई जिंदगी सोलापूर यांना अटक केली संशयीत तीन इसमांना विश्वासात घेवून, कौशल्याने त्यांना विचारपूस केली असता, त्यापैकी मन्सुरअली नदाफ याने सांगितले की, दि. ०६/०८/२०२६ रोजी पहाटेच्या वेळेस तो आणि त्याचे मित्र आहद इकबाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण व त्यांचा आणखी एक मित्र उमर मौलाली बिराजदार असे नई जिंदगी पाण्याचे टाकीखाली गप्पा मारत बसले होते, त्यावेळी त्यांचेत पुर्वी झालेल्या वादावरुन भांडण सुरु झाले. तेव्हा मन्सुरअली नदाफ याचे मित्र आहद इकबाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण यांनी उमर बिराजदार यास पकडले व मन्सुरअलीने त्याचेकडील धारधार शस्त्राने उमर याचे डोक्यात चार-पाच वार केले, तसेच त्याचे गालावर व हातावर मारले उमर जागीच रक्ताचे थोराळयात पडला. असे सांगून वरील तीन आरोपींनी मिळून, त्यांचा मित्र उमर बिराजदार याचा खुन केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली रु. ७०,०००/- किंमतीची एक हिरो स्प्लेंडर मोटार सायकल जप्त करून तीन आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक . गुन्हे श्रीमती संगीता पाटील या करीत आहेत. सदर खुनाचा गुन्हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकाने २४ तासाच्या आत, कौशल्याने व अविरत प्रयत्नाने 

उघडकीस आणला आहे.


सदरची कारवाई एम. राजकुमार पोलीस आयुक्त प्रितम यावलकर पोलीस उप आयुक्त परिमंडळ अरुण देवकर, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ तसेच भाऊराव बिराजदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन श्रीमती संगीता पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे एम.आय.डी.सी पो.स्टे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अल्फाज शेख, पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार, राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, दिलीप विधाते, आमसिध्द निंबाळ, अविनाश शिंदे, अविनाश डिगोळे, सचिन लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अमोल खरटमल, राहुल सुरवसे, अय्याज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.