Type Here to Get Search Results !

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेटचा पर्दाफाश; सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह 8 जण अटकेत

 



सोलापूर (प्रतिनिधी ) बनावट आधारकार्ड तयार करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात सोलापूरच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांसह एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे.पोलीस आयुक्तालयात दाखल गुन्हा क्रमांक 554/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 338, 340(2), 233, 235, 3(5) तसेच इतर संबंधित कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.तपासात आरोपींनी बनावट आधारकार्ड तयार करून दिव्यांग व्यक्ती असल्याचे खोटे कागदपत्र सादर करत UDID ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे मिळवून दिल्याचे निष्पन्न झाले आहे.अटकेतील आरोपींमध्ये अहमदनगर येथील एका शासकीय कर्मचाऱ्यासह सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि इतर कर्मचारी यांचा समावेश आहे.पोलीस तपासात 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत एकूण 3,714 दिव्यांग प्रमाणपत्रे सिव्हिल हॉस्पिटलमधून वितरित करण्यात आल्याचे समोर आले असून, त्यापैकी संशयास्पद प्रमाणपत्रांची सखोल चौकशी सुरू आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) आश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या 

नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर भरत चंदनशिव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विनोद राजपूत इमरान जमादार उमेश पवार रामा भिंगारे सुरज पवार अंकुश भोसले जावेद जमादार आबाजी सावळे विठ्ठल यलमार धीरज सातपुते अमोल यादव राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड महेश रोकडे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.