सोलापूर (प्रतिनिधी )येथील आर्थिक गुन्हे शाखा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अजित लकडे यांची नुकतीच सदर बझार पोलीस ठाणे या ठिकाणी दुसर्यांदा प्रशासकीय बदली झाली असून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सदर बझार पोलीस ठाणे येथे पदभार स्वीकारला आहे.
पत्रकार सुरक्षा समिती वतीने सदर बझार पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे म्हणाले की सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्या बरोबर सामाजिक सलोखा गुंडगिरीवर नियंत्रण ठेवून गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न राहील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत कायदा मोडण्याऱ्याची गय केली जाणार नाही कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही असं सांगत गुन्हेगारांना आगळा वेगळा इशारा दिला आहे.
सदर बझार पोलीस ठाणे हद्दीत उत्कृष्ट पोलिसिंग बरोबर जबरी चोरी घरफोडी सारखे गंभीर गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जातील
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी विष्णू सकट संदीप धोत्रे रशीद शेख महंमद तांबोळी इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.
