Type Here to Get Search Results !

दोन जबरी चोरी, दोन घरफोड्या अन् एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) मोका' अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामिनावर सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सफाल्या शिंदे, त्याचा विधीसंघर्षग्रस्त भाऊ आणि अन्य एका साथीदाराने मिळून मनगोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील वस्तीवरील एका ज्येष्ठ महिलेला लुटले होते. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने जबरीने चोरले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील दोघांना अंत्रोळी फाटा येथून ताब्यात घेतले. सागर शिंदेकडे केलेल्या तपासात दोन जबरी चोरी, दोन घरफोड्या आणि एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला 


सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सागर शिंदे व त्याच्या साथीदाराला मंद्रूपजवळील अंत्रोळी फाटा येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना नाव 

व पत्ता विचारला असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सहायक पोलिस निरीक्षक वाघ यांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव सागर शिंदे (वय २९) असून सोबत असलेला व्यक्ती आपला विधीसंघर्षग्रस्त भाऊ असल्याचे सांगितले. दोघेही मोहोळ तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी आहेत.


त्यांनी १५ ते २० दिवसांपूर्वी मनगोळी शिवारातील एका वस्तीवरील ज्येष्ठ महिलेला लुटले होते. तसेच मंगळवेढ्यातील दामाजी कारखाना रोडवरील एका घरातील महिला व तिच्या मुलालाही लूटल्याची 

 कबुली दिली. या प्रकरणातील विधीसंघर्षग्रस्त बालक १६ विविध घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये "वॉन्टेड" होता. तर सागर शिंदेविरुद्ध मंद्रूप, मंगळवेढा, कामती आणि सोलापूर येथील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.


मंगळवेढ्यातील सोड्डी येथील २०१८ मधील खून व दरोड्याच्या गुन्ह्यात सागरवर 'मोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ उपनिरीक्षक खाजा मुजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे नागेश कोणदे मोहन मनसावाले दिनेश पवार अक्षय डोंगरे ज्ञानेश्वर पाथरूट सतीश बुरकुल महिला पोलीस आश्विनी गोटे सुनंदा झळके यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.