Type Here to Get Search Results !

एमआयडीसी पोलिसांचा जलवा अवघ्या 24 तासात दोन आरोपी जेरबंद तब्बल 06 लाख 03 हजाराचा मुद्देमाल जप्त पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप.




​सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील बसवेश्वर नगर, नई जिंदगी परिसरात झालेली मोठी घरफोडी अवघ्या २४ तासांच्या आत उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ६ लाख ३ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


​फिर्यादी गौरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) हे नेहमीच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी उकाडा होत असल्याने बाजूलाच असलेल्या त्यांच्या दुसऱ्या घरामध्ये कुटुंबासह झोपण्यास गेले होते. ६ जुलै २०२६ रोजी रात्री १०:३० वाजता त्यांनी घर कुलूप लावून बंद केले होते. ७ जुलै २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजता ते उठून बाहेर आले असता, त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले २८.९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३६४ ग्रॅम चांदीचे दागिने आणि २५,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ५,०३,१८५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


​पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडीची गंभीर घटना घडल्याने पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार आणि गुन्हे पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले.


​गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली. दरम्यान, पथकातील पोलीस अंमलदार अमर शिवशिंगवाले आणि नागेशसिंग चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने शांतीनगरजवळ सापळा रचून दोन संशयितांना त्यांच्या मोटरसायकलसह शिताफीने ताब्यात घेतले.


​अटक केलेल्या आरोपींची नावे:

१. जिब्रान उर्फ शोएब युनूस शेख (वय २१ वर्षे, मूळ रा. ९५०/१, बी कॅम्प, रंगभवन रोड, सोलापूर; सध्या रा. बसवेश्वर नगरजवळ, भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर)

२. प्रशांत नागेश खंदारे (वय १९ वर्षे, रा. केशव नगर, इ.ओ.पट्टी, मौलाली चौक, सोलापूर)

*​२४ तासांत गुन्हा उघड; ६.०३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत*

​पोलिसांनी दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीला गेलेले सर्व दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. 


जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

​२८.९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने

​३६४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने

​नगद २५,०००/- रुपये रोख रक्कम

​गुन्ह्यात वापरलेली १,००,०००/- रुपये किमतीची मोटरसायकल आणि स्क्रू ड्रायव्हर

​एकुण जप्त मुद्देमाल: ६,०३,१८५/- रुपये

​गुन्हा दाखल झाल्यापासून अत्यंत परिश्रमाने पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना जेरबंद करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. असून पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे मधील अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप दिल्याने पोलीस अंमलदारांचे मनोबल वाढले आहे 


​सदरची कौतुकास्पद कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिध्द निंबाळ, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंग चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम आणि अविनाश डिगोळे यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.