सोलापूर (प्रतिनिधी ) दिनांक 15.07.2026 रोजी रात्रौ 21.30 वा.सुमारास ऍ़पेक्स स्टील ऍ़न्ड हॉर्डवेअर कंपनीची दिवसभर कलेक्शन केलेली रक्कम कंपनीचा ड्रायव्हर एजाज नबीलाल तांबोळी हा कंपनीचे मालकाच्या घरी घेऊन जात असताना सोलापूर हैद्राबाद हायवे रोड लगत पांढ-या इरटिका कार मधुन आलेल्या अज्ञात 3 इसमा पैकी एकाने ड्रायव्हर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हाल्वर मधुन दोन राऊंड फायर केल्यामुळे राऊंडचा छरा ड्रायव्हरचे छातीचे उजव्या बाजुस लागुन जखमी झाले होते. एजाज नबीलाल तांबोळी, वय 37 व्यवसाय ड्रायव्हर रा.कर्णिकनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून 3 अज्ञात इसमा विरूध्द दिनांक 16.07.2026 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
कुंदन गावडे पोलीस निरीक्षक, सोलपूर तालुका, पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/सोमनाथ कदम हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील अज्ञात 3 इसमाचा शोध होऊन गुन्हयाची उकल होणे करीता अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक व सुरज जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी 3 तपास पथके तयार केली
तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे गुन्हयातील अज्ञात आरोपीच्या मागावर असताना गोपनिय बातमीदाराने सदरचा गुन्हा बोरामणी येथील इसमानी केला असून ते संशयित इसम बोरामणी येथे असल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहिती च्या अनुषंगाने संशयित 4 इसमाचा शोध घेतला ते 4 संशयित इसम दिनांक 16.07.2026 रोजी मिळुन आले त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपूस केली असता त्यांनी इतर साथीदार यांचेसह गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. गुन्हयात एकूण 08 आरोपी निष्पन्न केले आहेत त्यापैकी 04 आरोपीना गुन्ह्याच्या तपासकामी दिनांक 16.07.2026 रोजी अटक करून मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.2 सोलापूर यांचे समोर दिनांक 17.07.2026 रोजी हजर केले असता मा. न्यायालयांनी त्या सर्वाना 21.07.2026 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
गुन्ह्यात निष्पन्न झालेले आरोपी पैकी ऍ़पेक्स स्टील ऍ़न्ड हॉर्डवेअर कंपनी मध्ये काम करणारा एक आरोपी यांने गुन्ह्यांतील आरोपीना माहिती पुरविली होती. त्या आरोपीचा सोलापूर तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बोरामणी गावात मिळुन आला त्यास दिनांक 17.07.2026 रोजी गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली दिली त्यास गुन्हयाचे अटक करून दिनांक 18.07.2026 रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं.2 सोलापूर येथे हजर केले असता मा.न्यायालयांनी 21.07.2026 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
गुन्हयात अटक केलेल्या आरोपी यांनी गुन्हा करताना वापरलेली इरटिका कार व 2 दुचाकी मोटार सायकल हस्तगत केले आहेत. सदर गुन्हयात एकूण 8 आरोपी पैकी 5आरोपी यांना जेरबंद केले असून उर्वरित 3 आरोपी याचा विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन तपास करत आहेत
सदरची कारवाई अतुल कुलकर्णीपोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सपोफौ/विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर शशिकांत कोळेकर महेश कटकधोंड धनराज गायकवाड पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी केली आहे.
