Type Here to Get Search Results !

वाहतुकीचे नियम पाळा; अपघात टाळा - सहाय्यक पोलीस निरीक्षक जकिकोरे, हेल्मेट घातलेल्या दुचाकी धारकांना दिले गुलाब पुष्प.




मोहोळ( अमर पवार)

मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस ठाणे व नॅशनल हायवे (nhai व 1033टीम) याच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.12/06/2026 रोजी इंचगाव टोल नाक्यावर वाहतुकीच्या नियमां विषयक जागृती करण्यात आली. यावेळी कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांनी वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांविषयक सखोल माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावर होत असलेले अपघात कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे डीवायएसपी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांविषयक जागृती करण्यात आली. दुचाकी चालवताना हेल्मेट घालने, ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवणे, दुचाकी सुस्थितीत असेल तरच चालवणे, इन्शुरन्स पॉलिसी काढणे, अशा अनेक वाहतुकीच्या नियमांविषयक उपस्थिती दुचाकीस्वारांना मार्गदर्शन केले. तसेच हेल्मेट घातलेल्या दुचाकी चालकांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्याच बरोबर चारचाकी व इतर वाहन धारकांना शिट बेल्ट, इन्शुरन्स, वेग मर्यादा, अशा अनेक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याविषयक जागृती केली तसेच ज्या-ज्या वाहन धारकांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले त्यांना नियमानुसार दंडात्मक कार्यवाही यावेळी करण्यात आली. सध्या होत असलेल्या अपघातांची कारणे ही त्यांनी सांगितली. जर वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर अपघात होत नसल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे यांनी सांगितले. इंचगाव टोल नाक्यावर वाहतुकीच्या नियमांविषयक फलक ही लावण्यात आले होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांविषयक माहिती देण्यात येत होती. हेल्मेट न घातल्यामुळे होणाऱ्या अपघाताच्या घटना ही सांगण्यात आल्या. घरी आपली कोणी तरी वाट बघत आहे. याची जाणीव ठेवत वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवावीत असे अहावन करीत वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा असे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर जकिकोरे म्हणाले. यावेळी nhai च्या 1033 टिमचे प्रमुख धनाजी माने यांनीही वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांविषयक माहिती दिली व अपघात कसे टाळता येतात हे सांगितले. वाहनचालकाना वाहतुकीच्या नियमांविषयक मिळालेल्या माहितीमुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कामती पोलीस ठाण्याचे ट्राफिकचे लोहार, कांबळे  पवार व 1033 टिम चे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.