सोलापूर (प्रतिनिधी ) महापालिकेने पाथरुट चौक परिसरातील सहा हजार स्क्वेअर फूट जागा एका मंगल कार्यालयाला भाड्याने दिली. या जागेवर अतिक्रमण करून राहिलेल्या नागरिकांनी हा भाडेकरार रद्द करावा या मागणीसाठी पाच महिला व एका पुरुषाने इंद्रभुवनाच्या पायऱ्यांवर अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कमुळे अनर्थ टळला. गुरुवारी दुपारी एक वाजता हा प्रकार घडला.
युवा भीमसेनेचे प्रमुख महेश डोलारे, वनमाला कदम आणि त्यांचे नातेवाईक दुपारी एक वाजता पालिकेत दाखल 'झाले. त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त होता. आम्हाला महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना भेटायचे असे सांगत गोंधळ करायला सुरुवात केली. त्यांची बदली झाली आहे. तुम्ही अतिरिक्त आयुक्तांना भेटा असे सांगत असताना कदम यांनी बाटलीतून आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले. त्यांच्यासोबतच्या एका तरुणाने अंगावर डिझेल टाकून घेतले. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि झटापट झाली. बाटलीतील डिझेल इंद्रभुवनाच्या पायऱ्यावर आणि दर्शनी भागात पसरले, सर्वत्र उग्र वास पसरला होता. हा प्रकार समजताच नगरसेवक शिवानंद पाटील आणि अनंत जाधव या ठिकाणी दाखल झाले सदर बझार पोलीस ठाणे येथील नेमणूकिस असलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र बनसोडे व झेड एम शेख हे जिल्हापरिषद येथील पुनम गेट या ठिकाणी बंदोबस्ता साठी तैनात असतात यापूर्वी देखील या ठिकाणी काही आंदोलन कर्ते अंगावर डिझेल टाकून घेणे तिरडी आंदोलन पुतळा जाळणेआत्मदहन सारखे उग्र स्वरूपाचे आंदोलन रोखण्यात सहाय्यक फौजदार राजेंद्र बनसोडे व सहाय्यक फौजदार झेड एम शेख यांना यश आले असून पुनम गेट आंदोलन उपोषण करणाऱ्या व्यक्तीची आस्थेवाईक पणे विचारपूस करणे संबंधीत अधिकाऱ्यांनी भेट घालून उग्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे बरेच मोठे आंदोलन सहाय्यक फौजदार राजेंद्र बनसोडे व सहाय्यक फौजदार झेड एम शेख यांच्या प्रयत्नाने रोखल्याने पोलीस प्रशासना वरील ताण कमी होत आहे.
