Type Here to Get Search Results !

एकतर्फी प्रेमातून मुलीला धमकी; तरुणाविरुद्ध 'पोक्सो' सोशल मीडियाद्वारे धमकीचे मेसेज; त्याच्या शोधासाठी पोलिस नाशिकला दादासाहेब गायकवाड यांच्या धडक व जलद कारवाई ने पालकांत समाधान




सोलापूर (प्रतिनिधी ) अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. त्यानंतर स्नॅपचॅट 'वरून तिला मेसेज पाठविले. तुला आणि तुझ्या घराला बरबाद करतो' अशी धमकीही त्याने दिली. - प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी जापूर नाका पोलिसांत धाव घेतली. च्या फिर्यादीवरून वसीम शेख व्याविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा बल झाला आहे.


संशयित आरोपी वसीम हा २०२३ २४ जून २०२६ या कालावधीत ब्ला त्रास देत होता. तो वारंवार

त्या अल्पवयीन मुलीला बोलण्याचा प्रयत्न करीत होता. कॉलेजमध्ये असताना तो तिचा नेहमीच पाठलाग करून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तो पीडितेला सतत मेसेज देखील करायचा. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्या मुलाला व त्याच्या पालकांना समजावून 

सांगितले होते; तरीदेखील वसीमचे त्रास देणे सुरूच होते. मुलीच्या स्नॅपचॅट अकाउंटवर रिक्वेस्ट पाठवून तो तिला सतत मेसेज करीत होता. 'जाऊ दे तुला असे नाही समजणार, बघ आता उद्या कसं समजावतो तुला, नक्की समजेल तुला, तुझं घर कसं बरबाद 

करतो, तुझं नाव ऐकले तरी तुझा जीव मारावा वाटत आहे' अशा धमकीचा मेसेज संशयित आरोपी वसीमने पीडितेला पाठविला होता. पीडितेने ही बाब घरी सांगितली आणि पीडितेच्या वडिलांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला, पण तो कामाला नाशिकला असल्याचे समजले. त्याला शोधायला (शुक्रवारी) विजापूर नाका पोलिसांची एक टीम जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक तरंगे तपास करीत आहेत.

*या कलमा अंतर्गत दाखल केला गुन्हा*

बीएनएस मधील कलम 78 पाठलाग कारणे किंवा 

सायबर स्टॉकिंग (कोणत्याही महिलेची मर्जी नसताना तिचा सतत पाठलाग करणे किंवा इंटरनेट /सोशल मीडियाद्वारे तिच्यावर नजर ठेवणे ( या गुन्ह्याशी संबंधित आहे 

कलम 12 पोस्को बालकांच्या लैंगिक अत्याचाराची संबंधित हे कलम आहे कलम 12 हे लैंगिक छळ या गुन्हेशी जोडलेले आहे यात लहान मुला मुलींची अयोग्य स्पर्श लैंगिक शिरेबाजी किंवा बालकांना लैंगिक हेतूने त्रास देणे या गोष्टी येतात 

विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या जलद व धडक कारवाई ने पालकांत समाधान व्यक्त केलं जात आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.