सोलापूर (प्रतिनिधी ) शहराच्या मध्यवर्ती भागातील वर्दळीच्या रस्त्यावरील शिवकुमार ज्वेलर्समधून तिघांनी पाच लाखांचे दागिने लुटून नेले. एकाच्या हातात लोखंडी रॉड, दुसऱ्याच्या हाती पिस्तूल होते. शनिवारी (ता. १३) दुपारी साडेबाराच्या सुमारास हा थरार घडला. खुर्शीद आलम शेख (रा. इंदिरा नगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीनुसार, दरोडेखोरांनी दुकानातून पाच लाखांचे दागिने लुटून नेले. त्यांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची शोधासाठी चार पथके नेमली आहेत.
सोलापुरात आलेल्या या तिघांनी आदल्या दिवशी (शुक्रवारी) कुर्डुवाडीतील एका हाउसिंग सोसायटीतून दुचाकी चोरली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी रस्त्यावरील वर्दळीचा अंदाज घेतला व ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकानाच्या काउंटवर खुर्शीद शेख होते. त्यांना दरोडेखोरांबद्दल अंदाज आला होता, त्यामुळे दरोडेखोर दुकानात येताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. लोक
दुकानाकडे येत असल्याचे पाहून एक हातात बसतील तेवढे दागिने घेतले,एकाने
पिस्तूल दाखविले व तेथेच दुचाकी सोडून पसार झाले. पोलिस येण्यापूर्वीच तिघेही पळाले व काही अंतरावर अंगावर शर्ट बदलून बोळाबोळांतून पसार झाले परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसतात, पण चेहरे स्पष्ट दिसत नाहीत आता त्यांची शरीरयष्टी, चेहरा, अशा बाबींवरून त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे चार पथके गुन्हेगारांचा शोध घेत असून गुन्हेगारांना पाताळून शोधून काढणार असा आत्मविश्वास शहर गुन्हे शाखेचे सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी व्यक्त केला आहे.

