सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले निस्वार्थी निगर्वी सदाबहार अंमलदार म्हणजे रवींद्र परबत
पोलीस दलातील आगळा वेगळा माणूस कधीही भेटा तुमचं स्वागत हसतमुखानेचं होणार वर्दीचा ना गर्व ना मोठेपणा कधीच न मिरवता नेहमीच तणावमुक्त, चेहऱ्यावर
स्मितहास्य अन नम्रपणा लाडाने त्यांना शहरातील पत्रकार बांधव रवी म्हणतात आमचा आजपर्यंतचा अनुभव, काम असो वा नसो नुसता मेसेज मोबाईलवर टाकला तरी या अध्यक्ष म्हणन हॉटेल मध्ये हात पकडून चहा पाजणारे रवी परबत यांचे विचारा बरोबर मन देखील खूप मोठे आहे मान सन्मान अभिमान प्रसिद्धी या तकलादू गोष्टीपासून ते नेहमीच दूर राहून सर्वसामान्य नागरिकांना कायद्याच्या चौकटीत राहून मदत करतात हद्दीतील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पिढीत घटकांच्या तीव्र भावना वेळीच ओळखून त्यांचे म्हणणे शांत पणे ऐकून योग्य तो मार्ग अन तोडगा काढण्याची हातोटी अन किमया रवींद्र परबत यांच्यात नेहमीचदिसून येते फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा कोणताही प्रसंग
अथवा घटना असो अगोदर रवींद्र परबत यांचे नाव घेतले जाते बऱ्याच अडचणी बाबत रवींद्र परबत यांची नुसती भेट झाली तरी काम होते अशी भावना सर्वसामान्य माणसांची झाली असून तो विश्वास रवींद्र परबत यांनी आपल्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेत निर्माण केला आहे पोलीस दलाची आण बाण अन शान वाढवण्यासाठी रवींद्र परबत नेहमीच प्रयत्नशील असून पोलीस दलाची प्रतिमा अन प्रतिभा जपण्याचा त्यांनी आजवर प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. फौजडार चावडी
ठाण्याचे अंमलदार
रवींद्र परबत यांनी पोलीस सेवेतील 35 वर्षे निस्सीम व निष्कलंक सेवा बजावली असून पत्रकार बांधवामध्ये रवींद्र परबत यांचे नाव अतिशय प्रेमाने व आदराने घेतले जाते हे विशेष आमच्या सारख्या जेष्ठ पत्रकारांचा नेहमीच आदर करणारे, सन्मानपूर्वक विचारपूस करणारे अजात शत्रू रवींद्र परबत यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झालेने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून पोलीस दलाची सेवा अतिशय निष्ठापूर्वक घडावी हीच मनोकामना
आपला
*यशवंत पवार*
प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र
संस्थापक -पोलीस मित्र सोशल फौंडेशन
संपादक -साप्ताहिक कार्यसम्राट
संपादक - कार्यसम्राट न्यूज
सोलापूर.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
