सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर लगत असलेल्या गोदुताई नवीन विडी घरकुल (कुंभारी) परिसरातील रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बरेच बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरातील कोणतीही डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सुमारे दोन महिन्यापूर्वी नवीन विडी घरकुल परिसरातील बोगस डॉक्टरवर कारवाई करणे बाबत वळसंग पोलीस ठाणे येथे रीतसर लेखी स्वरूपाची तक्रार केली होती. त्या तक्रारीचा तपास नवीन विडी घरकुल पोलीस चौकीच्या एका प्रतीतयश नामवंत हवालदारकडे असल्याची माहिती मिळाली दोन महिने उलटून गेले तरी त्या अलवेज बिझी असलेल्या हवालदारांना जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांच्या तक्रारी अर्जाकडे ढुंकून देखील पाहायला वेळ मिळाला नसल्याची खुमासदार चर्चा ऐकायला मिळत असून ते हवालदार दोन महिन्यापासून नेमक्या कोणत्या कामात बिझी आहेत ? याचा मात्र शोध लागता लागेना कदाचित मोठया कामगिरीत ते हवालदार व्यस्त असल्याची आम्ही आमच्याच मनाची समजून काढून वळसंग पोलीस ठाणे येथे बोगस डॉक्टर कारवाई प्रकरणी दिलेला तक्रारी अर्ज निकाली काढण्याची विनंती सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना करावी लागली जेष्ठ पत्रकारांचा तक्रारी अर्ज जणू भेळचा कागद समजून त्या बहूचर्चीत हवालदाराने कचराकुंडीत टाकला असावा असा नाराजीचा सुर आळवत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी अखेर वळसंग पोलिसांचा नाद सोडला जेष्ठ पत्रकारांच्या तक्रारी अर्जाला जर वळसंग पोलीस केराची टोपली दाखवत असतील तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीचे काय ? असा जळजळीत सवाल उपस्थित होत असून वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टर व्यवसाय करत असून ही बाब वळसंग पोलिसांना माहिती नसावी ? यांच मात्र अप्रूप वाटायला लागलं असून बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी त्या नामचिन हवालदारांना कोणता मुहूर्त हवायं? यासाठी सुप्रसिद्ध ज्योतिष महाशयचा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार शोध घेत आहेत.
