Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्ठमंडळाने घेतली पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांची भेट.




सोलापूर (प्रतिनिधी ) 

गेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती वतीने  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता व जाहिराती साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी  ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाला टोल मधून मुक्ती ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर पूरक व्यवसाय करता यावा म्हणून पाच लाख रुपयांचे कर्ज मिळणे त्याच बरोबर पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण यासह  राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अत्यंत प्रभावी पणे काम करत असून राज्यातील पत्रकारांचे अनेक विषय राज्यसरकार कडे पाठपुरावा करून सोडवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना पत्रकारिता बरोबर जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी पत्रकारांना पाच लाख रुपयांचे विना जामीन कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सोलापूर चे जिल्हाधिकारी त्याच बरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून पत्रकारांना पाच लाख रुपये कर्ज बाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी मा उद्योग संचालनालय मुबंई यांना पत्र देऊन पत्रकार सुरक्षा समिती च्या मागणीचा विचार कारून योग्य ती कार्यवाही करण्याचे कळवले आहे  पोलीस उपायुक्त (परिमंडळ ) म्हणून नुकताच प्रितम यावलकर यांनी पदभार घेतला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कार्यालयात नूतन पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर यांची भेट घेतली तसेच त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी 

प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी संघटक गणेश निंबाळकर प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी सिद्धाराम हमाले महंमद तांबोळी रेहमान फत्तेपूर इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.