Type Here to Get Search Results !

संवेदनशील गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. बेपत्ता अर्पिताचा केवळ 07 तासांत शोध वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी




सोलापूर (प्रतिनिधी ) अर्पिता मल्लिकार्जुन बगले वय 10 वर्षे मुळ रा.मु.पो. माळकवठे, ता.द. सोलापूर ही सोलापूर येथील नातेवाईक शुभम रेवणसिध्द बिराजदार रा. 11/25 बसवेश्वर निवास बसवनगर भवानी पेठ सोलापूर यांचेकडे राहणेस आली होती. दिनांक 29/05/2026 रोजी सकाळी 09:30 वा.चे सुमारास अर्पिता बसवेश्वर निवास येथून बेपत्ता झाली होती. त्याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गु.र.नं.482/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर घटना घडल्यानंतर एम राज कुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ. अश्वीनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर मुलीचा तात्काळ शोध घेणे बाबत सूचना दिल्या होत्या.


त्याअनुषंगाने श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाचे व आजूबाजूचे परिसरामध्ये सी.सी.टी.व्ही. फुटेजची बारकाईने पाहणी केली असता अर्पिता ही कुंभार वेस, मधला मारूती, टिळक चौक मार्गे अश्वीनी हॉस्पिटल कडे गेल्याचे दिसून आल्याने गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर मुलीचा कसोशीने शोध घेत होते.

बेपत्ता अर्पिता ही अश्वीनी हॉस्पिटल ते रिमांड होमचे दरम्यान दिसून आल्याची माहिती गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार संजय साळुंखे यांना मिळाली. त्यानुसार पो.स.ई मुकेश गायकवाड व इतर पोलीस अंमलदार यांनी तात्काळ माहितीच्या ठिकाणी शोध घेतला असता अर्पिता त्या ठिकाणी मिळून आली. अर्पिता हिस तिच्या नातेवाईकां समक्ष विचारपूस केली असता ती रस्ता चुकल्याने घर शोधत फिरत असल्याचे निष्पन्न झाले.अश्या प्रकारे 

शहर गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बेपत्ता अर्पितास अवघ्या 07 तासात शोधून तिच्या नातेवाईकांकडे सुखरूपपणे सुपुर्द केले.


सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त,राजन माने सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, वाजिद पटेल, योगेश बर्डे, महेश शिंदे, शैलेश बुगड, संजय साळुंखे, अजिंक्य माने, अभितीत धायगुडे, काशिनाथ वाघे, भारत पाटील, सिध्दाराम देशमुख, धिरज सातपुते, सुभाष मुंढे चालक बाळासाहेब काळे, शाम सुरवसे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.