Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरात ७ लाखांची घरफोडी उघडकीस जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 04 चोरांच्या मुसक्या आवळल्या.




सोलापूर ((प्रतिनिधी ) शहरातील जोडभावी पेठ 

आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने संयुक्त कामगिरी करत मोठ्या घरफोडीचा छडा लावला. पुना नाका परिसरातील बंद घर फोडून तब्बल सात लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे सोने-चांदीचे दागिने, रोकड आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यात संतोष संजय कांबळे (वय ३६), साईनाथ संतोष मोरे (वय २०), चंद्रकांत सौदागर मोरे (वय २०, तिघेही रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ) आणि भारत विलास आखाडे (वय २०, रा. काळके वस्ती) यांना अटक 

 केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,


फिर्यादी भरत कमल किशोर काबरा (रा. नाकोडा रेसिडेंसी, पुना नाका) हे कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करून चोरटे पसार झाले होते. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे प्रकटीकरणाच्या पथकास चोरट्यांच्या शोधा संबंधी आदेश दिले होते. तपासादरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना गोपनीय माहिती मिळाली होती. संशयित आरोपी रूपाभवानी मंदिरामागील स्मशानभूमी परिसरात 

 थांबले आहेत. पोलिसांनी तातडीने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ७५ हजारांची सोन्याची अंगठी, तुळशी माळ, चांदीची बिस्किटे, एक लाख २५ हजारांची रोकड आणि चोरीत वापरलेल्या दोन दुचाकी, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त प्रीतम यावलकर, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, सुहास चव्हाण, अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर, श्रीनाथ महाडिक यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अजय चव्हाण अमोल खरटमल रवी धेंडे कृष्णात बडूरे विनोद पुजारी शिवानंद भिमदे विनोद व्हटकर अतिष पाटील विनायक जाधव ज्ञानेश्वर गायकवाड पंकज घाडगे सूरज सोलनकर कुमार शेळके शशिकांत दराडे जोडभावी पोलीस ठाणे येथील खाजप्पा आरेनवरू शीतल शिवशरण दत्ता मोरे निलेश घोगरे दत्ता काटे स्वप्नील कसगावडे किरण जाधव अनिता मोरे शिवानंद मैंदर्गी यांनी पार पाडली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.