Type Here to Get Search Results !

फायर ब्रँड कारवाईने अरविंद माने चर्चेत ज्वेलर्सवर पिस्टलचा धाक दाखवत चोरी करणारे ०२ गुन्हेगार अटकेत तब्बल 06 लाख 30.000 हजाराचा मुद्देमाल जप्त पोलीस आयुक्त यांची कौतुकाची थाप शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी.




सोलापूर (प्रतिनिधी ) १३/०६/२०२६ रोजी दुपारी १२:३० वा. सोलापूर शहरातील शिवकुमार ज्वेलर्स, ७० फूट रोड, सोलापूर या ठिकाणी अॅक्सेस स्कुटीवर आलेल्या ०३ इसमांनी ज्वेलर्सवर पिस्टलचा धाक

दाखवत सोन्याचे दोन नेकलेस जबरी चोरी बाबत सदर बझार पोलीस ठाणे, येथे गु.र.नं.४८०/२०२६ भा. न्या. संहिता कलम ३०९ ( २ ) ३०९ (४), ३(५) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर जबरी चोरीची गुन्हा गंभीर असल्याने उघडकीस आणणे बाबत एम राज कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप-आयुक्त (गुन्हे /वि.शा.) दिलीप पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना आदेश दिला होता जबरी चोरीचा गंभीर गुन्हा घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील 04 तपास पथके तयार करत मार्गदर्शन केले गुन्ह्यांच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी.सी.टी.व्ही

फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडून माहिती प्राप्त करण्याच्या सुचना दिल्या.त्यानुसार गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, निलेश पाटील-सोनवणे, तुकाराम घाडगे यांनी गुन्ह्याचे घटनास्थळापासून सोलापूर शहरातील विविध ठिकाणांचे सुमारे 250 सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांची तपासणी करून मिळविलेल्या तांत्रिक व गोपनिय माहितीचे आधारे आरोपींची ओळख पटवत 

गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दिनांक 13/06/2026 रोजी शिवकुमार ज्वेलर्स 70 फूट रोड सोलापूर या दुकानातुन जबरी चोरी केलेले 02 सोन्याचे नेकलेस 

 विक्री करण्यासाठी 02 इसम हे होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोटार सायकलवर अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरा जवळ थांबलेले आहेत गोपनिय माहितीची खात्री करून गुन्हे शाखेकडील तपास पथके व पोलीस अमलदार यांनी सापळा रचून अॅक्टीव्हा मोटार सायकलवरील 02 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.

त्यावेळी गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता (1) जिलानी म.रफिक दामटे,वय 33 वर्षे, सध्या रा. 70 फूट रोड नुरूल इस्लाम मस्जिदच्या बोळात सोलापूर मुळ राह. सर्व्हे नं. 12, लक्ष्मी नगर| फिरदोस मस्जिदचे पाठीमागे, येरवडा पुणे (2) साहिल उर्फ भाई नवी नंदियाल वय 24 वर्ष, सध्या रा. जमा मस्जिद समोर सलगरवाडी, डोणगाव रोड सोलापूर मुळ रा. सर्व्हे नं. 12, लक्ष्मी नगर येरवडा पुणे असे सांगितले.02 इसमांपैकी जिलानी याची तपासणी घेतली असता कंबरेस खोचलेली देशी बनावटीची पिस्टल सोबत 03 जिवंत काडतुसे व पॅटचे उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला. तसेच दुसरा इसम साहिल याच्या तपासणीत पॅटच्या

उजव्या खिशामध्ये 01 सोन्याचे नेकलेस व डाव्या खिशात रेडमी कंपनीचा मोबाईल फोन मिळून आला अधिक तपास केला असता त्यांनी सांगितले की, 9/6/2026

रोजी आम्ही दोघे व साथीदार मित्र ( 3 ) रेहान उर्फ जडया रमजान लडाफ उर्फ शेख रा. मिल्लत नगर, शाहाबाद जि. कलबुर्गी राज्य कर्नाटक सध्या रा. नुरानी मस्जिद शेजारी, लक्ष्मी नगर,येरवडा पुणे. असे मिळून शिवकुमार ज्वेलर्स शॉपची रेकी करून ते लुटण्याची योजना आखली. साहिल उर्फ भाई नंदियाल व रेहान उर्फ जड्या यांनी गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोटार सायकल दिनांक 12/06/2026 रोजी कुर्डुवाडी जि.सोलापूर येथून चोरी केली दोघे वाहनावरून 13/06/2026 रोजी सोलापूर येथे आले तिघे एकत्र येऊन ज्वेलर्स दुकान मालकास पिस्टलचा धाक दाखवून जबरीने 02 सोन्याचे नेकलेस चोरून नेले होते. चोरी करताना दुकान मालकाने आरडा ओरडा केल्यामुळे लोक त्या ठिकाणी जमून त्यांना पकडतील या भितीने गुन्हा करते वेळी वापरलेली मोटार सायकल त्याच ठिकाणी सोडून पळून गेले होते. गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल ही कुर्डुवाडी

जि. सोलापूर येथून चोरलेली असून त्या बाबत कुर्डुवाडी पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गु.र.नं. 280/2026 भा. न्या. सं. कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल आहे.अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे व निलेश

सोनवणे पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गंभीर जबरी चोरीचा व एक मोटार सायकल चोरीचा असे 02 गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केला आहे. 01

20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस 2,6000/

02 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस

2,34,000/-

03 गुन्हा करताना वापरलेली सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोटार सायकल

50,000/-

क्रमांक MH. 12 PM. 1877

04 देशी बनावटीची पिस्टल व 03 जिवंत काडतुसे 56000/

05 विवो कंपनीचा मोबाईल फोन 15000/

06 रेडमी कपनीचा मोबाईल फोन 15000/

एकुण

6,30,000/-

सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील,

पोलीस उप-आयुक्त (गुन्हे / वि.शा.) दिलीप पवार सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली

श्री. अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, शैलेश खेडकर, तुकाराम घाडगे, निलेश पाटील 

सोनवणे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, अंकुश भोसले, जावेद जमादार 

धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद रजपुत, सिध्दाराम देशमुख,विजयकुमार 

वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंखे, उमेश पवार, अभिजित धायगुडे, आबाजी सावळे काशिनाथ वाघे, भारत पाटील, वसिम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंढे, राजकुमार पवार 

शेलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजीद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे,

अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे 

 चालक सतिश काटे बाळासाहेब काळे, फरदिन शेख यांनी केली आहे. या फायर ब्रँड कारवाई चे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तोंडभरून कौतुक करत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व त्यांच्या टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.