Type Here to Get Search Results !

खुनाच्या मालिकेनंतर रात्रीची नाकाबंदी पुन्हा सुरू रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कोंबिग ऑपरेशन करणार -पोलीस उपायुक्त डॉ आश्विनी पाटील




सोलापूर ( प्रतिनिधी ) शहरातील सत्तर फूट रोड नेहमीच वर्दळीचा सकाळी नऊच्या सुमारास जीमवरून घरी निघालेल्या तरुणाचा सहा जणांनी रस्त्यावरच निर्धूण खून केला. यामुळे शहर पोलिसांचा गुन्हेगारांमधील धाक कमी झालाय का?असा सवाल उपस्थित होऊ लागला. भाजपच्या त्याअनुषंगाने पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांना निवेदन दिले. या घटनेनंतर पोलिसांनी आता बंद पडलेली कागदावरील रात्रीची नाकाबंदी पुन्हा

सुरू करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही पाळत ठेवली जात आहे. त्यांच्या संशयास्पद हालचाली जाणून घेण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविले जाणार आहे 

सोलापूर शहरात सात पोलिस ठाणी असून, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदीचा निर्णय झाला होता. अधूनमधून रेकॉर्डवरील संशयित आरोपींवर लक्ष ठेवून त्यांच्याकडे चौकशी देखील केली जायची. मात्र, पोलिसांची ही 

कार्यवाही काही दिवसांपासून बंद पडली होती. पण, कुंचीकोरवी गल्लीतील सहा जणांनी कट रचून सुरेश कृष्णा श्रीराम (रा. रफिक नगर, एमआयडीसी, सोलापूर) केला. संशयित काहीजण रेकॉर्डवरील या तरुणाचा रविवारी भर रस्त्यातच खून गुन्हेगार असून, मृत सुरेश देखील सराईत गुन्हेगार होता. खुनानंतर सामान्य भीती दूर करून जनतेचा पोलिसांवरील जनतेच्या मनातील गुन्हेगारांबद्दलची विश्वास दृढ व्हावा म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.


शहरातील रात्रगस्त, गुडमॉर्निंग पथके, नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन या सर्व बाबीची माहिती माहिती शहर गुन्हे शाखेसह सात ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दररोज पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना द्यावी लागणार आहे. 

*गर्दीच्या ठिकाणी दोन तास गस्त रात्री तीन तासाची नाकाबंदी*


आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी किंवा आवश्यक त्या परिसरात सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत पोलिस ठाण्यांचे

अधिकारी, गुन्हे प्रकटीकरण पथकाची पहाटे २ वाजेपर्यंत नाकाबंदी असेल. गस्त राहील. त्यानंतर रात्री ११ ते पहाटे २ वाजेपर्यंत घरा बाहेर फिरणारे किंवा मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार दिवसा-रात्री कोठे असतात, त्यांची दिनचर्या काय, यावरही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. जेणेकरून भविष्यातील गंभीर घटना टळतील, हा त्यामागील हेतू आहे.


आता दररोज प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदी असेल. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेदहापर्यंत पोलिस ठाण्यांच्या प्रकटीकरण पथकांची गस्त राहील हद्दीत अधिकाऱ्यांची व तेथील गुन्हे शहर गुन्हे शाखेचेही अधिकारी अंमलदार त्याठिकाणी असतील. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर दररोज लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनदेखील राबविले जात आहे.अशी माहिती पोलीस उपायुक्त 

डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.