सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार तथा जिल्हा संघटक कलीम शेख होते
पोलीस मित्र सोशल फौंडेशन वतीने सोलापूर शहरातील विविध भागातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र आणून पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असून नागरिकांमध्ये समन्वय असावा पोलिसांशी दिलखुलास संवाद व्हावा सामाजिक सलोखा वाढवण्यात नागरिकांची पोलिसांना मदत व्हावी पोलीस आणी नागरिक यांच्यातील दुवा त्याच बरोबर सुसंवाद साधून गुन्हेगारी रोखणे कायदा सूव्यवस्था राखणे गुन्हेगारा विषयी पोलिसांना माहिती पुरवणे
शहरातील घडणाऱ्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचवणे
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी /अंमलदार यांच्या बातम्या करणे
पोलीस अधिकारी / अंमलदार यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करणे
पोलीस प्रशासन अन पत्रकारांमध्ये समन्वय ठेवणे पदोन्नती झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदारांचा सत्कार करणे
या करिता पोलीस मित्र सोशल फौंडेशन ची निर्मिती केली असल्याचे संस्थापक यशवंत पवार यांनी यावेळी सांगितले पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर या वर्षात आरोग्य शिबीर नेत्र शिबीर झाडे लावणे वनीकरण स्वच्छता अभियान जेष्ठ वकील मार्फत कायदेशीर मार्गदर्शन सह विविध उपक्रम राबवण्या बाबत एकमताने निर्णय घेण्यात आला
यावेळी संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष राजू वग्गू जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सुरवसे सोलापूर शहर अध्यक्ष अंबादास गज्जम संघटक अतुल भडंगे सचिव गणेश निंबाळकर प्रसिद्धीप्रमुख सिद्धाराम हमाले अमोल कुलकर्णी राजाभाऊ पवार अनिल भिंगारे जुबेर शेख सोमनाथ मुंजे मुज्जमील काखंडीकर महेश मेटकरी इत्यादी उपस्थित होते.
