Type Here to Get Search Results !

रात्री घरफोडी करणारे दोघे जेरबंद तब्बल 100 सिसिटीव्ही ची केली तपासणी फौजदार चावडी पोलीसांची दमदार कामगिरी.




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील अभिमानश्री

नगरातील पंधे अपार्टमेंटमधील संजय येवूलकर यांच्या घरी १३ मे रोजी चोरी झाली होती. त्यांच्या घरातून एक लाख ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्याच दिवशी एका गॅस एजन्सीत काम करणाऱ्या कामगाराची दुचाकीही चोरीला गेली होती. फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन चोरट्यांना जेरबंद केले.


पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले. त्यावेळी एक दुचाकीस्वार परिसरातील कॅमेऱ्यात कैद झाला होता; मात्र तो अस्पष्ट दिसत होता. त्या रोडवर गॅस सिलिंडरसंदर्भातील काही कागदपत्रे पडली होती. पोलिसांनी ती कागदपत्रे घेऊन संबंधित गॅस एजन्सीत धाव घेतली. ती कागदपत्रे किसान शिंदे (रा. वसंत विहार, सोलापूर) यांची होती. ते गॅस एजन्सीत काम करतात. त्यांच्याकडे एकाने गॅस कनेक्शनसाठी कागदपत्रे, दिली होती. पोलिसांनी शिंदे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. सीसीटीव्हीतूनही पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नव्हती.


सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर


यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू ठेवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केल्यानंतर बाळे ब्रिजजवळ पहाटे पावणेपाचच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून जाताना दिसले. पोलिसांनी सर्व टोल नाके व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले.


धाराशिव रोडवरील तामलवाडी टोल नाक्यावरील सीसीटीव्हीतही ते दुचाकीस्वार दिसले; मात्र अंधारामुळे तेही अस्पष्ट होते. पोलिसांनी राज्यभरातून माहिती मिळविली. विशाल दत्तात्रय तांदळे (रा. मंचर, पुणे) हा एक महिन्यापूर्वीच येरवडा कारागृहातून सुटला होता. त्याची चोरी करण्याची पद्धतही अशीच होती. पोलिसांनी खबऱ्यांकडून त्याची माहिती मिळविली. विशाल व त्याचा साथीदार शाहुराज बाबासाहेब कोकरे (रा. घाटा पिंपरी, बीड) यांनी सोलापुरात घरफोडी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांना अटक करून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दुचाकी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली.


ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत, पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख संजय क्षीरसागर यांच्या पथकातील बसवेश्वर परीट शिवानंद भीमदे कृष्णा बडूरे विनायक जाधव पंकज घाडगे विनोद व्हटकर विनोद पुजारी अजय चव्हाण सूरज सोनवलकर आयाज बागलकोटे मोरे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.