Type Here to Get Search Results !

वैद्यकीय पेशाला काळिमा फासणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करा - यशवंत पवार यांची वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर लगत असलेल्या गोदुताई नवीन विडी घरकुल (कुंभारी) परिसरातील रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बरेच बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरातील कोणतीही डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.




त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण व डिग्री बाबत अधिक चौकशी करत नाही त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल भागात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत या परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षापासून सुरु बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे याबाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी वळसंग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असून कारवाई ची मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.