Type Here to Get Search Results !

.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो - नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.




  सोलापूर (प्रतिनिधी ) श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो असल्याचे मनोगत सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी 

जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी श्री 

वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती च्या सेवा कार्याबद्दल बोलताना सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.यांनी देवस्थान समितीचे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अणि क्रिडा क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. धार्मिक क्षेत्रात नियोजन व सुलभ स्वामी दर्शनाच्या व्यवस्थेसह, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, संकल्पित अन्नदान, सामाजिक कार्यात विविध आरोग्य शिबिरे, गोरगरीब नागरिकांचे पाल्यांना शैक्षणिक मदत, सामुदायिक विवाह सोहळे, संत महात्मे यांच्या जयंती व पुण्यतिथीस धान्य स्वरूपातील मदत, विविध सामाजिक उपक्रमात मदत, सांस्कृतिक क्षेत्रात विविध कलागुणांना वाव देण्यासाठी पुरस्कार वितरण, कलाकारांना शासकीय योजनेतून मानधन मिळून देणे कामी शिफारस करून मंजूर करून घेणे, भजनी मंडळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना प्रशस्तिपत्र देणे, शैक्षणिक क्षेत्रात कै.कल्याणराव इंगळे तंत्र निकेतन महाविद्यालयात तंत्र शिक्षणाची उत्कृष्ट व्यवस्थापन, विद्यार्थी वसतिगृह, विद्यार्थ्यांना मोफत भोजन, गरीब पाल्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, क्रिडा क्षेत्रात अक्कलकोट शहरातील विविध खेळांच्या खेळाडू यांना मार्गदर्शन व सहकार्य, सोलापूर जिल्हा क्रिडा असोसिएशन यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंची निवास व भोजनाची चोख व्यवस्था आदींसह मंदिर समितीचे आणखीन बरेच उपक्रम या समाजाला संघटित करून त्याची गुणवत्ता उंचावण्यास पूरक आहेत याचा आढावा आपण सोलापूर जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर घेतला आहे, त्यामुळे 

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, व उपक्रम पाहून आपण धन्य झालो असल्याचे मनोगतही 

नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवास व श्री स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक व पारंपारीक पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्यास निमंत्रीत केले. यावेळी तहसीलदार विनायक मगर, गटविकास अधिकारी शंकरराव कवीतके, अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, अक्कलकोचे मंडल अधिकारी जुबेर नदाफ, तलाठी एस.डोईफोडे, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, रमेश शिंदे 

प्रा.शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे, विपूल जाधव आदींसह भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.