Type Here to Get Search Results !

डान्सबारवर आमदार देशमुखांनी पुन्हा वेधले लक्ष




सोलापूर (प्रतिनिधी )

शहरासह जिल्ह्यातील अवैध डान्सबारप्रकरणी आमदार सुभाष देशमुख यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुसऱ्यांदा सरकारचे लक्ष वेधले. याप्रकरणी कारवाई करण्याची सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांना सूचना देण्यात येईल, असे आश्वासन तालिका अध्यक्ष आमदार समाधान आवताडे व मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. अर्थ संकल्पीय विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरवातीला २४ फेब्रुवारी रोजी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अवैध डान्सबारचा मुद्दा

उपस्थित करत कारवाई करण्याची मागणी केली होती. स्थानिक पोलिसांच्या

 संरक्षणाखाली अवैध


डान्सबार सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्याचा मुद्दा त्यांनी मांडला होता. तेव्हा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जिल्ह्यात मोडनिंब येथील कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या कुंटणखान्यात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. 18) पुन्हा लक्षवेधी मांडली.

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील डान्सबारचा मुद्दा मांडला होता. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत, याकडे लक्ष वेधले होते. मंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, कालच एका डान्सबारमध्ये एकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले. त्यावर तालिका अध्यक्ष, आमदार आवताडे यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर मंत्री देसाई यांनी याप्रकरणी सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांना कारवाईच्या सूचना देण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.