Type Here to Get Search Results !

खोट्या तक्रारी बसला चाप सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पोलिसांनी महिल व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांचे पोलीस आयुक्तांनी केले विशेष कौतुक

  



सोलापूर (प्रतिनिधी ) मिळालेल्या माहितीनुसार, महिला आरोपी आणि आरोपी क्रमांक २ हे सन २०२२ पासून एकमेकांच्या ओळखीचे असून ते प्रियकर-प्रेयसी आहेत. आरोपी क्रमांक २ वर यापूर्वीही विजापूर नाका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणात त्याला २२ डिसेंबर २०२३ रोजी अटक झाली होती. नंतर १८ सप्टेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून त्याला जामीन मिळाला.

मात्र या जामिनाविरोधात फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर १७ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेत आरोपी क्रमांक २ चा जामीन रद्द केला.दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी साक्षीदार व त्याच्या नातेवाईकांवर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी क्रमांक २ ला त्याचा फायदा होईल, या हेतूने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने कट रचला. त्यानुसार १८ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधित महिलेने डायल ११२ वर फोन करून तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खोटी माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ या घटनेची सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड, वैद्यकीय तपासणी तसेच महिलेची मैत्रीण आणि बहिण यांच्याकडून माहिती घेतली. अखेरीस महिलेची कसून चौकशी केल्यानंतर तिने ही घटना घडली नसून ती खोटी असल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खोटी माहिती देणे आणि कट रचणे या आरोपांखाली महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली


 विजापूर नाका पोलीस ठाणे पथक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, API सविता मोरेपाटील, PSI सविता क्षिरसागर, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अप्पा पवार,अजय परदेशी, गणेश शिर्के, सचिन हार, फुटाणे, जाधव, सद्दाम अबादीराजे, अमृत सुरवसे, कोर्सेगांव, समाधान मारकड, राहूल विटकर, स्वप्नील जाधव, संतोष माने, राठोड, साळुंखे यांनी केले आहे. विजापूर नाका पोलीस ठाणे येथे खोटी तक्रार देऊन अडकवण्याचा गंभीर अन धक्कादायक प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या अचूक व भेदक नजरेने हाणून पाडला असून शहरातील अतिशय गुंतागुंतीच्या संवेदनशील प्रकरण पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी अतिशय कौशल्य पूर्ण हाताळलं असून निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आणला असून सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अश्या पहिल्यांदाच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार उघडकीस आणून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावरच पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी गुन्हे दाखल केल्याने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर चाप बसला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांचे विशेष अभिनंदन करत कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.