सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर दलातील कर्मचारी भागवत शिंदे यांनी भारत श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत देशात पाचवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा पत्रकारांच्या वतीने मानाची टोपी शाल व पुष्प हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
या प्रसंगी अनेक पत्रकारांनी पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांच्या उल्लेखनीय कामगिरी चे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे सोलापूर शहराचे नाव राज्य व देश पातळीवर उज्ज्वल झाले आहे.
भागवत शिंदे यांनी कठोर मेहनत, जिद्द व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी साध्य केली असून युवकांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार मिलिंद प्रक्षाळे,नितीन करजोळे, सुरज रजपूत,सिद्धाराम नंदर्गी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे लतीफ नदाफ,गिरमल्ला गुरव पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक अरूण सिडगिद्दी अशोक ढोणे, सुधीर डोळ्ळे, आबासाहेब तळभंडारे, ऋषिकेश ढेरे, अस्लम नदाफ, अश्फाक शेख विजयकुमार झुंजा,सोहेल जहागीरदार,
सिद्धार्थ भडकुंबे, निसार उस्ताद शेख, अशोक चव्हाण आदींसह पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
