सोलापूर (प्रतिनिधी ) जेलरोड पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे २७/०२/२०२६ रोजी मार्केट यार्ड सोलापुर येथुन एक रिक्षा त्याची किंमत अंदाजे २,५०,०००/- रुपये किंमतीची चोरी झालेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तसेच दिनांक-०५/०३/२०२६ रोजी सुधाकर व्यकटेश सिंघम यांच्या राहत्या घरातुन २९ ग्रॅम सोन्याचे चैन किंमत ४,५०,०००/- (चार लाख पन्नास हजार रुपये) चोरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहा. पोलीस. निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमललदार यांना पोलीस आयुक्त एम. राजकुमार पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण यांनी गुन्हा आदेशित केले होते.
दिनांक २८/०२/२०२६ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील पोकॉ-९८९ संतोष वायदंडे, पोकों-१४७५ कल्लप्पा देकाणे, पोशि/८८८ उमेश सावंत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली एक इसम चोरीच्या गुन्हयातील रिक्षा विक्रीकरता अक्कलकोट रोड स्मशानभुमीजवळ येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि संदीप पाटील व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी सापळा लावला रोहित रवींद्र जाधव वय ३२ वर्षे रा शाहीर वस्ती भवानी पेठ सोलापुर यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र नामे विकास सुरेश जाधव वय ३२ वर्षे रा निराळे वस्ती सोलापुर याचेसोबत मिळुन चोरी केली असल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडुन एकुण ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन एकुण २ रिक्षा जप्त केलेल्या आहे.
सदरबाबत जेलरोड पोलीस ठाणे गुरनं १७६/२०२६ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा अवघ्या २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.
दिनांक ०५/०३/२०२६ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील स. फौ. एम डी नदाफ, पोकों-९८९ संतोष वायदंडे, पोकॉ-१४७५ कल्लप्पा देकाणे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीच्या गुन्हयातील सोने विक्रीकरता चिप्पा मार्केट, अशोक चौक येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरुन त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि संदीप पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदारांनी सापळा रचून अनिल लक्ष्मण मंजुळकर, वय २२ वर्षे, राहणार- अशोक चौक, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर यास ताब्यात घेतले घेवुन गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी चोरी केली असल्याची कबुली दिली. सदर आरोपीकडुन ४,५०,०००/- (चार लाख पन्नास हजार रुपये) रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
सदरबाबत जेलरोड पोलीस ठाणे गुरनं १८५/२०२६ बीएनएस कलम ३०५ प्रमाणे गुन्हा अवघ्या २४ तासाचे आत उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे.
सदर कामगिरी .एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर पोलीस उपआयुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण सोलापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सफो शरिफ शेख, गजानन कणगिरी, एम. डी. नदाफ, पोलीस हवालदार वसंत माने, धनाजी बाबर, अब्दुल वहाब शेख, अयाज बागलकोटे, पोलीस नाईक भारत गायकवाड, पोकों-इकरार जमादार, उमेश सावंत, कल्लप्पा देकाणे, संतोष वायदंडे, विठठल जाधव, अर्जुन गायकवाड यांनी केली आहे.
