सोलापूर (प्रतिनिधी) रांची (झारखंड) येथे दि. ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत आर्चरी – रिकर्व्ह या क्रीडा प्रकारात श्रीमती निर्मलाताई ठोकळ कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कु. प्रगती शिंदे हिने १७ वर्षे वयोगटात पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली.अमरावती येथे दि.18 ते 20 डिसेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत आर्चरी - रिकव्हर या क्रीडा प्रकारात प्रगती शिंदे हिने 17 वर्षे वयोगटात पुणे विभागाकडून खेळताना या स्पर्धेत एकूण चार पदके मिळवली. त्यात 1 सुवर्णपदक, 1 रौप्य पदक, 2 कांस्यपदक यांचा समावेश आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची रांची -झारखंड येथे दि. 6 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आर्चरी - रिकव्हर महाराष्ट्र संघातून निवड झाली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत कु. प्रगती शिंदे हिने एकूण दोन पदकांची कमाई केली असून त्यामध्ये एक सुवर्णपदक व एक कांस्यपदक यांचा समावेश आहे. कु. प्रगती हिला पुणे येथील तज्ञ मार्गदर्शक श्री. रंजित चामले तसेच महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक श्री. सुरवसे ए. पी. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री. सचिन ठोकळ, सचिव श्री. भिकाजी गाजरे, संचालिका श्रीमती शिल्पाताई ठोकळ तसेच प्राचार्य श्री. डी.डी. गाजरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्याअसून प्रगती शिंदे या विजापूर नाका पोलीस ठाण्यातील कर्मचारी भागवत शिंदे यांच्या कन्या आहेत.
