सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर-बार्शी रोडवरील खेडपाटी जवळील घुंगरू कला केंद्रावर सोलापूर तालुका पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी दोन महिला अश्लील हावभाव करून संगीताच्या तालावर नाचत होत्या. पोलिसांनी तेथून एक कार, साऊंड जप्त केला आहे. यात दोन महिला, तीन प्रेक्षक, व्यवस्थापक व केंद्राच्या मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
उपनिरीक्षक महेश घोडके पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदारांनी त्यांनी घुंगरू कला केंद्रातील प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यावेळी पोलिसांचे पथक खेडपाटीजवळील घुंगरू कला कंद्राजवळ पोचले. पोलिसांनी कला कद्रात प्रवेश केला. त्यावेळी दोन महिला अश्लील हावभाव करून साउंड सिस्टिमच्या तालावर नाचताना दिसल्या त्याठिकाणी अक्षय नागनाथ माने हा व्यवस्थापक होता. त्याने केंद्राचे चालक अरुण रोडगे असल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारवाई पोलिस अधीक्षक अतुलकुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, यांच्या नेतृत्वातील पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके महिला पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट पोलीस हवालदार जगताप अभिजीत साळुंखे अकबर शेख महिला पोलीस अंमलदार पाटील यांनी ही कारवाई केली आहे
