Type Here to Get Search Results !

पोलीस रायझिंग डे निमित्त वळसंग पोलीस ठाणे वतीने वाहतूक व्यवस्थापन व जनजागृती




सोलापूर (प्रतिनिधी ) पोलीस रायझिंग डेच्या निमित्ताने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीचे सुरळीत व्यवस्थापन राखणे तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती व नियंत्रणात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या.


याअंतर्गत कुंभारी येथील टोल नाका तसेच वळसंग येथील टोल नाका व वळसंग गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी  मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले. सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर नियंत्रण राहावे तसेच वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, यासाठी उपस्थित जनसमुदायास पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

वाहन चालविताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे, दुचाकीवर त्रिसीट प्रवास टाळणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक शिस्त पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. तसेच पोलीस बँड पथक द्वारे देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

सदर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान वसंत पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार उपस्थित राहून वाहतुकीचे प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले. राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत राहिली असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

पोलीस विभागामार्फत भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व अपघातमुक्त वाहतूक व्यवस्थेसाठी अशा प्रकारच्या जनजागृती व नियंत्रणात्मक मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.