Type Here to Get Search Results !

पत्रकार घरकुल योजना बाबत राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे 26 जानेवारी रोजी लाक्षणिक आंदोलन.

 



सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्य माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतः ची पक्की घरे नाहीत सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात रहात असून अल्प मानधन व तुटपुंज्या मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पत्रकारांना आपल्या मालकी हक्काची घरे घेता आली नाहीत कोरोना सारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूर च्या जिल्हाधिकारी यांना दिनांक १८/६/२०२५ निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती त्याच बरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजना बाबत निवेदन सादर करण्यात आले होते.

पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून राज्य सरकार च्या व केंद्र सरकार च्या अनेक योजना पासून तो दुर्लक्षित आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता तो केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारिता करत असून तो घरकुल योजना पासून वंचित आहे स्वता ची पक्की घरे नसलेल्या पत्रकार बांधवाना पंतप्रधान आवाज योजना मधून घरकुल योजना साकार करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली असून राज्य सरकार कडे सातत्याने पाठपुरावा केलेला आहे घरकुल योजना पासून वंचित असलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवाज योजना मधून मालकी हक्काची घरे मिळावीत म्हणून राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती 26 जानेवारी रोजी स्वातंत्र्य दिनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकार सुरक्षा समिती च्या बैठकीत दिली आहे

आहे त्याच बरोबर पत्रकार घरकुल योजना बाबत जास्तीस जास्त पत्रकारांनी आपल्या हक्काच्या लढाई मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन देखील पत्रकार बांधवाना केलं आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा सचिव अंबादास गज्जम धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष झाकीर शेख दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष अमित राठोड सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) कार्यकारी अध्यक्ष वसीमराजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव रमेश दग्गारी प्रसिद्धी प्रमुख अमोल कुलकर्णी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद व्यंकटेश गज्जम इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.