Type Here to Get Search Results !

नवीन विडी घरकुल परिसरातील बेकायदेशीर असलेल्या गॅस पॉईंट कायमस्वरूपी बंद करा अमोल कुलकर्णी यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार, पोलीस अधीक्षक यांच्या कारवाई कडे घरकुल वासियांचे लागून राहिले लक्ष

 



सोलापूर (प्रतिनिधी ) नवीन विडी घरकुल  पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये काही उपनगरात रिक्षामध्ये बेकायदेशीरित्या घरगुती गॅस भरण्यासाठी काही ठिकाणी बेकायदेशीर गॅस पॉइंट असून दिवसा व रात्री या भागातील रिक्षांना या गँस पॉईंट वरून बेकायदेशीर रित्या रिक्षात गॅस भरला जात असून सदरची बाब अतिशय गंभीर व चिंताजनक असून नागरी वसाहतीमध्ये अशा पद्धतीने अवैधरित्या रिक्षात गॅस भरणे अतिशय धोकादायक असून एखादी अप्रिय घटना  घडली किंवा गॅस चा स्फ़ोट



 झाल्यास जीवित व वीत्त हानी मोठया प्रमाणात होण्याची शक्यता दाट असून अशा बेकायदेशीर गॅस पॉईंट मुळे या परिसरातील नागरिकांच्या जिवीताला मोठा धोका निर्माण झाला आहे  असून अशी बेकायदेशीर गॅस पॉईंट कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी सोलापूर चे पोलीस अधीक्षक  यांच्याकडे केली असून याप्रकरणी जातीने लक्ष घालून नवीन विडी घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीतील बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या गॅस पॉईंट चालकावर कारवाई करून या भागातील  रिक्षात गॅस भरणारे गॅस पॉईंट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी विनंती देखील लेखी पत्राद्वारे केली असून पोलीस अधीक्षक यांच्या कारवाई कडे घरकुल वासियांचे लक्ष लागून राहिले आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.